आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्पोरेट ऑफिसपेक्षा जास्‍त सुविधा असणारे गुजरातचे नं. 1 पोलिस स्‍टेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुज- जिल्‍ह्यातील अंकलेश्‍वर येथील पोलीस स्‍टेशनचे गृहराज्‍यमंत्री रजनीकांत पटेल यांच्‍या हस्‍ते उद्घाटन झाले. सर्व प्रकारच्‍या सोयी-सुविधा असल्‍यामुळे या पोलीस स्‍टेशनला आयएसओ नामांकन मिळाले आहे.
या पोलीस स्‍टेशनमध्‍ये ग्रंथालय, जिम, ऑरो पॉल्‍ट, कॉन्फरन्स हॉल, ई-सुविधा, ई-फिंगर प्रिन्‍ट, सीसीटीव्‍ही सर्व्हेलन्स, नागरी सुविधा केद्र, एयर कंडीशन वेटींगरूम या सारख्‍या विविध सुविधा आहेत. पोलीस प्रशासनासाठी लागणा-या आधुनिक वाहन यंत्रणा या पोलीस स्‍टेशनकडे आहे.
शिवाय पोलीस स्‍टेशन आवाराच्‍या चारही बाजुने बाग असल्‍यामुळे अंकलेश्‍वर या पोलीस स्‍टेशनला आयएसओचा 9001 दर्जा मि‍ळाला आहे.
या पोलीस स्‍टेशनमध्‍ये अत्‍याधुनिक सोयी-सुविधा असल्‍यामुळे राज्‍याच्‍या विकासासाठी अंकेलश्‍वर पोलीस स्टेशन हे मैलाचा दगड ठरणार असल्‍याचे प्रतिपादन रजनीकांत पटेल यांनी या लोकार्पण सोहळ्यानिमित्त केले. हे पोलीस स्‍टेशन फक्‍त आरोपींना पकडण्‍यासाठी नाही तर त्‍या बरोबर च सर्वसामान्‍य लोकांशी संवाद साधण्‍याचे माध्‍यम असल्‍याचे जिल्‍हा पोलीस अधिक्षक बिपिन आहिर यांनी सांगितले.
अंकलेश्‍वरच्‍या पोलीस स्‍टेशनचे छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा.....