आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाने मित्रांकडून बहिणीचे अपहरण केले..शेतात नेले, अन् सैराट झालं जी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- फायनान्सर बहादूर सिंह वाला यांच्या बीरेन आणि राजवीर या दोन मुलांनी आपलीच सख्खी बहीण पूनमचे (22 वर्षे) अपहरण करून तिची हत्या केली. बीरेन आणि राजवीरने मित्रांकडून पूनमचे अपहरण केले. तिला शेतात नेले आणि तिची निर्घृण हत्या केली. हत्या झाल्यानंतर भावांनी बहिणीवर अंत्यसंस्कारही केले.

पतीशी घटस्फोट झाल्यानंतर पूनम आपल्या वडिलांच्या घरीच राहत होती. प्रेम प्रकरण आणि परदेशात जाण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या भांडणानंतर ही हत्या झाली. निनावी अर्ज आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली आणि हे प्रकरण उघडकीस आणले. दोन्ही भावांना अटक झाली आहे. त्यांच्या ३ फरार मित्रांचा शोध सुरू आहे.
 
पूनम आणि तिची आई २५ मे रोजी सकाळी ८ वाजता मंदिरात दर्शन करून घरी परत आल्या होत्या. तेव्हा मोठा मुलगा बीरेन आणि धाकटा मुलगा राजवीर आपल्या तीन मित्रांसोबत घरी आले. दोन्ही भावांनी पूनम आणि आईला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. बहिणीला समजावतो, असे सांगून आईला रस्त्यातच उतरवले. ते बहिणीला घेऊन भांगडा या वडिलांच्या गावी पोहोचले. तेथे एका शेतात घेऊन जाऊन त्यांनी बहिणीला बळजबरीने विष पाजले आणि नंतर बहिणीने विष घेऊन आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांना सांगितले. त्यांनी रात्रीच गावातच अंत्यसंस्कारही केले.

पोलिस आयुक्तांना मिळाले होते निनावी पत्र
राजकोटमध्ये ऑनर किलिंगची चर्चा होती. पण कोणीही पुढे येऊन बोलण्यास तयार नव्हते. त्याच वेळी आयुक्त अनुपसिंह गेहलोत यांना पूनमची हत्या झाली असे सांगणारे निनावी पत्र मिळाले. पोलिसांनीही गुपचूप चौकशी सुरू केली. जेव्हा ऑनर किलिंगचे पुरावे मिळाले तेव्हा पूनमच्या वडिलांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. पोलिसांसमोर येताच वडिलांनी या प्रकरणाची माहिती दिली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. घटनेशी संबंधित फोटोज..
बातम्या आणखी आहेत...