आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Tell A Terrorist Jackets In Summer Odd Behavior

'उन्हाळ्यात कोट घातलेली आणि साधा-सरळ दिसणारी व्यक्ती दहशतवादी असू शकते'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) येथे कार्यशाळा सुरु आहे. या कार्यशाळेत 'दहशतवाद्यांना कसे ओळखाल' या शिर्षकाखाली अनेक पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यासोबतच काही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
उन्हाळ्यातही जॅकेट परिधान केलेली व्यक्ती किंवा सर्वसामान्य वागणूक वाटत असली तरी ती व्यक्ती दहशतवादी असू शकते, अशी माहिती संघाच्या कार्यशाळेत देण्यात येत आहे. येथे लावण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनात जॅकेट घातलेली व्यक्ती दाखविण्यात आली आहे. उन्हाळ्यातही जॅकेट घालण्याचे कारण म्हणजे, मेटल डिटेक्टरचा अडथळा सुरक्षीत पार करण्यासाठी जॅकेटचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय येथे मुंबई दहशतवादी हल्ला, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला याचे पोस्टर लावण्यात आलेले आहे. एका पोस्टरमध्ये प्रवाशांनी गच्च भरलेलीन एक रेल्वे दाखवण्यात आली आहे, आणि त्यावर लिहिले आहे की आपली रेल्वे सुरक्षीत आहे का?
दहशतवाद्यांना कसे ओळखाल?
संघाकडून लावण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनात सांगितले जात आहे, की उन्हाळ्यातही कोट घातलेली व्यक्ती आणि साधा सरळ दिसणारा एखादा माणूस मेटल डिटक्टर आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी कोणतीही शक्कल लढवू शकतो. हे पोस्टर प्रदर्शन सुग्रहीत सुरक्षा मंचकडून लावण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या तीन दिवसीय शिबीरासाठी 26 हजार स्वंयसेवक उपस्थित राहाणार आहेत. संघाचे ज्येष्ठ नेते यासाठी उपस्थित राहाणार आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल शुक्रवारीच येथे आल्या होत्या.