आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Wants To Make His Wife To Get Pregnant 16th Time

33 वर्षांच्या महिलेच्या 15 डिलेव्हरी, तरी मुलासाठी पती टाकतोय दबाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- रामसिंह पत्नी कनूसोबत.)
दाहोद (गुजरात)- पत्नी सोळाव्यांदा गर्भवती व्हावी आणि तिने दुसऱ्या मुलाला जन्म द्यावा यासाठी येथील शेतकरी पती दबाव टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या पत्नीने म्हटले आहे, की आतापर्यंत मी 15 वेळा गर्भवती राहिली. पुन्हा गर्भवती होण्याची माझ्यात ताकद नाही. सध्या या दांपत्याला 14 मुली आणि एक मुलगा आहे. तरीही पतीला आणखी एक मुलगा हवा आहे.
दिले विचित्र कारण
रामसिंह असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने सांगितले, की आमच्या समाजात बहिणींच्या लग्नाचा भार भावांना उचलावा लागतो. मला जास्त मुली आहेत. अशा वेळी एकटा मुलगा हा खर्च कसा काय उचलेल... म्हणून मला आणखी एक मुलगा हवा आहे. एवढेच नव्हे तर मुलीला मुलगा झाला तर तिच्या सासरी भेटवस्तू द्याव्या लागतात. त्यामुळे प्रचंड खर्च येतो. एवढा खर्च माझा एकटा मुलगा कसा करेल?
सर्वांत मोठी मुलगी 17 वर्षांची
रामसिंह याची सर्वांत मोठी मुलगी 17 वर्षांची तर दुसरी मुलगी 15 ची आहे. या दोघींचे गेल्या वर्षी लग्न झाले. तीन मुली सध्या माध्यमिक शाळेत शिकत आहेत. मुलगा दोन वर्षांचा आहे. एक मुलीचा जन्म याच महिन्याचा दोन तारखेला झाला आहे.
पत्नी म्हणते, नको...
रामसिंहच्या पत्नीचे नाव कनू आहे. त्यांच्या लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. 33 वर्षांची कनू सांगते, की आमच्या नशिबात केवळ एक मुलगा आहे. आता मला मुलगा होणार नाही. माझ्यात एवढी शक्ती राहिलेली नाही. मला माझे गर्भाशय काढून टाकायचे आहे. मला आता आई व्हायचे नाही. नुकतीच आम्हाला एक मुलगी झाली. आता पती मुलासाठी दवाब टाकत आहे.