आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Not Dreaming Of Becoming Prime Minister Says Narandra Modi

पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहत नाही, 2017पर्यंत गुजरातची सेवा करणारः मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांच्‍या पत्रामुळे पुन्‍हा वादात अडकलेले गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मी पंतप्रधानपदाचे स्‍वप्‍न पाहत नसल्‍याचा दावा केला आहे. काही बनण्‍याचे स्‍वप पाहण्‍यापेक्षा काही करुन दाखविण्‍याचे स्‍पप्‍न प्रत्‍येकाने पाहावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला आहे. काही बनण्‍याचे स्‍वप्न पाहणारे उद्ध्‍वस्‍त होतात. मी पंतप्रधानपदाचे स्‍वप्‍न पाहत नाही. मला 2017 पर्यंत गुजरातची सेवा करायची आहे, असे मोदींनी स्‍पष्‍ट केले आहे.

शिक्षक दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते. विद्यार्थ्‍यांनी विचारलेल्‍या काही प्रश्‍नाच्‍या उत्तरात त्‍यांनी हा मद्दा स्‍पष्‍ट केला.