आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक: माणूस आहे, चुका करतो! महागाईच्या हिशेबावर राहुल गांधी यांचे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ट्विटरवर महागाईबाबतचा चुकीचा हिशेब केल्याप्रकरणी राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधींनी ट्विट केले, मी नरेंद्रभाईंसारखा नाही. मी माणूस आहे आणि माझ्याकडून चुका होतात. ट्विटरवरील प्रश्नांच्या मालिकेतील सातवा प्रश्न विचारताना हिशेबात केलेल्या चुकीबाबत राहुल असे म्हणाले. राहुल गांधींनी ट्विटरवर गुजरातमधील महागाईचे आकडे पोस्ट केले होते, पण त्यात काही चुका होत्या. 

 

 

काय म्हणाले राहुल.. 
राहुल गांधींनी ट्विट करत लिहिले की, मला भाजपमधील सर्व मित्रांना सांगायचे आहे, मी नरेंद्रभाईंसारखा नाही, मी माणूस आहे. आपण सर्वच काही विचित्र चुका करतो. त्यातून जीवन अधिकच रंजक होत जाते. ही चूक दाखवल्याबद्दल आभार. असेच करत राहा. यातून मला सुधारण्यास मदत मिळेल.

 

चार्टमध्ये अशी झाली चूक.. 
राहुल गांधींनी पोस्ट केलेल्या चार्टमध्ये प्रत्येक वस्तुची टक्केवारी 100% टक्क्यांनी अधिक लिहिण्यात आली. उदाहरण द्यायचे झाल्यास 2014 मध्ये डाळीचे दर 45 रुपये आणि 2017 मध्ये 80 रुपये प्रति किलो सांगण्यात आले आहेत. या दरानुसार 77% ची वाढ म्हणायला हवे होते, पण त्यांनी तक्त्यात 177% लिहिले. 

 

 

2014 2017 वाढ
गॅस सिलिंडर 414 रु. 742रु. 179% (हवे होते 79%)
डाळ 45 रु./किलो 80 रु./किलो 177% (हवे होते 77%)
टमाटे 35 रु./किलो 100 रु./किलो 285% (हवे होते 186%)
कांदा 40 रु./किलो 80 रु./किलो 200% (हवे होते 100%)
दूध 38 रु./लीटर 50 रु./किलो 131% (हवे होते 32%)
डिझेल 56 रु./लीटर 63 रु./किलो 113% (हवे होते 12.5%)

 

या चार्टखाली लिहिले होते, महागडे शिक्षण, महागडे उपचार गुजरातमध्ये महागाईचे राज्य.


राहुल गांधींनी ही कविताही पोस्ट केली..
जुमलों की बेवफाई मार गई
नोटबंदी की लुटाई मार गई
GST सारी कमाई मार गई
बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई
बढ़ते दामों से जीना दुश्वार
बस अमीरों की होगी भाजपा सरकार?


ट्विटरवर प्रश्नांची मालिका..
राहुल गांधी ट्विटरवर 22 वर्षांचा हिशेब मागत एक मालिका चालवत आहेत. त्यावर रोज मोदींना एक प्रश्न विचारत आहेत. गुजरात के हालात पर ‘प्रधानमंत्री जी से सवाल’ लिहून ते प्रश्न ट्विट करतात.

 

राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न पाहा, पुढील स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...