आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Was Not Silent On Gujarat Riots, Narendra Modi Says News In Divya Marathi

गुन्हेगार असेन तर फाशी द्या पण माफी मागणार नाही;गुजरात दंगलीवरून मोदींनी ठणकावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरात दंगलीच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर मला भर चौकात फासावर चढवा, अशी शिक्षा करा की पुढील 100 वर्षांत पुन्हा असा गुन्हा करण्याची कुणी हिंमत करणार नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत मी माफी मागणार नाही, असे नरेंद्र मोदी यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 2002मधील दंगलीबद्दल मोदींनी माफी मागावी अशी विरोधकांची मागणी आहे. त्यावर मोदींनी माफी मागण्यास नकार दिला.

2002 अथवा 2007मध्ये माझा पराभव झाला असता तर माफीचा मुद्दाच आला नसता. परंतु मोदीचे पाय ओढण्यासाठी काही लोक झपाटलेले आहेत. पण मोदी हरणार नाही. मरणार नाही, असे मोदी म्हणाले.

वढेरांवर सूडबुद्धीने कारवाई नाही
भाजप सत्तेत आल्यास गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वढेरांविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई केली जाणार नाही, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. शिवाय वाराणसीच्या मुस्लिमांची भेट घेतल्यानंतर तेही माझ्यावर प्रेम करतील, असा दावाही त्यांनी केला. वढेरा यांच्या वादग्रस्त जमीन सौद्याबद्दल छेडले असता भाजप सरकारचा कारभार सकारात्मक असेल. कुणावरही सूडबुद्धीने कारवाई होणार नाही, असे ते म्हणाले.