आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरबांवर राक्षसांचा ताबा, मोदींना मुस्लीम टोपी घालण्याचा प्रयत्न करणा-या इमामांचे वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमाम मेंहदी हसन

अहमदाबाद - नवरात्रोत्सवाच्या तोंडावर एक वेगळेच वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. 2011 मध्ये नरेंद्र मोदींना मुस्लीम टोपी परिधान करण्याचा आग्रह केल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेले इमाम मेंहदी हसन यांनी शहरात आयोजित केल्या जाणा-या गरबांवर राक्षसांचा ताबा असल्याचे वक्तव्य केले आहे.
खेडा गावात झालेल्या एका कार्यक्रमात इमामांनी इतरही काही वादग्रस्त वक्तव्ये केली. गरबा एक धार्मिक उत्सव नाही तर, राक्षसांसाठीचे मनोरंजन असल्याचे ते म्हणाले आहेत. या वक्तव्यावर विश्‍व हिंदू परिषदेने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान, इमामांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रकरणाची संवेदनशीलता पाहता नवरात्रोत्सवाच्या मंडळांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे.
आणखी काय म्हणाले इमाम
इमामांनी रविवारी आपले मत मांडताना सांगितले की, गरब्यात साधू, संत दिसून येत नाहीत. त्याउलट यात चित्रपट कलाकार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे लोकच अधिक दिसून येतात. भडक कपडे परिधान करून हे लोक नाचतात. लव्ह जिहादबाबातही इमामांनी प्रतिक्रिया दिली. लोक म्हणतात की, साडेचार लाख हिंदु मुलींना मुस्लीम तरुण आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही म्हणतात, मुस्लीम युवकांना गरब्यात प्रवेश देऊ नये. पण धार्मिक उत्सवांबाबत अशा उघडपण प्रतिक्रिया देणे योग्य आहे का? असा सवाल इमामांनी मांडला.

अटकेची मागणी
विश्‍व हिंदू परिषदेच्या गुजरात कार्यकारिणीचे सरचिटणीस रणछोड भारवाड यांनी या वक्तव्यानंतर इमामांना अटक व्हायला हवी, असे म्हटले आहे. पोलिसांनी इमामांना अटक केली नाही, तर आम्ही त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊ असेही भारवाड यावेळी म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांत गरब्यात मुस्लीम तरुणांना प्रवेश देण्यात येऊ नये अशी मागणी अनेक संघटनांकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर सध्या तणावाचे वातावरण आहे.
पुढे पाहा...नवरात्रोत्सवाच्या तयारीचे PHOTO