आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१०० रुपयांत पकडला १ हजार कोटींचा बेकायदेशीर व्यवहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - गुजरातमध्ये सुरत येथील आयकर विभागाने (आयटी) केवळ १०० रुपये खर्च करून चार नारळांच्या मदतीने १००० हजार कोटी रुपयांच्या बेहिशेबी व्यवहारांचा पर्दाफाश केला आहे. येथील "श्रीहरी जेम्स' या हिरे कंपनीच्या हिशेबांमध्ये मोठ्या प्रमाणात अार्थिक अनियमितता आढळून आली आहे. ही कंपनी श्रीहरी जेम्सची उलाढाल १७५ कोटी रुपये असल्याचे दाखवत होती. एक नंबर आणि दोन नंबरच्या व्यवहारांचा समांतर कारभार करून करचोरी केली जात होती. सूत्रांनी िदलेल्या माहितीनुसार, १००० हजार कोटी रुपयांच्या हिशेबांचा घोळा सिद्ध झाला, तर त्यावर ३३० कोटी रुपयांचा कर कंपनीला भरावा लागणार आहे.

वास्तविक, हिरे व्यवसायाचे डायमंड युनिट सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. कुणाचा डोळा चुकवून त्यात प्रवेश करणे शक्य नाही. त्यामुळे आयटी अधिकाऱ्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी शंभर रुपयांची चार नारळे खरेदी केली व ती मोठ्या गिफ्ट पॅकेटसारखी पॅक केली. कार्यालयात पोहोचल्यावर त्यांनी हे गिफ्ट डायमंड युनिटच्या मालकांना भेट द्यायचे आहे, असे सांगितले. आत जाऊन त्यांनी सर्व व्यवहारांची तपासणी केली. अशाप्रकारे केवळ १०० रुपये खर्च करून १००० हजार कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहारांचा भंडाफोड केला. ही कारवाई नोव्हेंबर २०१५ मध्ये करण्यात आली होती; परंतु त्याचा खुलासा आयटी विभागाकडून आता करण्यात आला आहे.

मालमत्ता जप्तीची कारवाई होणार
हिरे कंपनीची ही फर्म सुरत जिल्ह्यातील कतारगाममध्ये आहे. आयटी विभागाने नोव्हेंबर २०१५ मध्ये या कंपनीवर लक्ष ठेवून तिचे सर्वेेक्षण केले होते. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर बेहिशेबी व्यवहार हजार कोटी रुपयांच्या वर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याचा विभागाने एक अॅप्रायझल रिपोर्ट सेंट्रल सर्कल विंगला पाठवले. केंद्रीय िवभागानेही हा आर्थिक घोळ १००० कोटींपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट केले, आता बेहिशेबी व्यवहारांचे मूल्यांकन पूर्ण करून आयटी िवभाग जप्तीचीही कारवाई करणार आहे.
कंपनीने दिली ८५ कोटींच्या काळ्या पैशाची कबुली
पथकाकडून कंपनीच्या व्यवहारांची तपासणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीला १ कोटी रुपयांची रोकड मिळाली होती, तर हिरे व्यावसायिकांनी ८५ कोटी रुपयांच्या बेहिशेबी पैशाची कबुली िदली होती. या कंपनीच्या सुरतव्यतिरिक्त मुंबई व भावनगरमध्येही फर्म आहेत. या तिन्ही ठिकाणी तपासणी केल्यावर ५० पोते भरून कागदपत्रे जप्त करण्यात अाली. ही कागदपत्रे गेल्या आर्थिक वर्षातील होती व त्यातून अधिकाऱ्यांनी हजार कोटी रुपयांच्या बेहिशेबी व्यवहारांचा भंडाफोड केला.

सर्वोत्तम तपास मोहिमांपैकी एक
आयकर िवभागाने यासंदर्भात एक प्रारूप खटला तयार केला असून देशातील सर्वाेत्तम शोधमोहिमांमध्ये त्याचा समावेश व्हावा यासाठी दिल्लीच्या केंद्रीय आयकर संचालकांच्या कार्यालयाकडे विचारार्थ पाठवला आहे. आयटी सूत्रांनी िदलेल्या माहितीनुसार, कंपनीकडे हा बेनामी पैसा कुठून आला व कसा गेला, त्याचा इतर व्यवहारांशी कशाप्रकारे संबंध आहे, याचे सर्व पैलू जोडण्यात आले आहेत. या फर्ममध्ये नंबर एक व दोनचे व्यवहार समांतर पद्धतीनेच चालवले जात होते. त्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जात होता. कंपनीचे तीन भागीदार असून ते तिघेही वेगवेगळा कोडवर्ड वापरत होते. सोफा व इतर ठिकाणी कागदपत्रे दडवून ठेवण्यात आली होती; परंतु अधिकाऱ्यांना पक्की माहिती मिळाल्याने त्यांना यंत्रणेला चकवा देणे शक्य नव्हते.
बातम्या आणखी आहेत...