आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Begins World's Largest Democratic Exercise Latest News Election 2014

‘लोकशाहीचा उत्सव’ पाहण्यासाठी विदेशी पर्यटक भारत भेटीस इच्छुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचे बिरुद मिरवणार्‍या भारताच्या निवडणुकीतील उत्सवात सहभागी होण्यासाठी विदेशी पर्यटकांनी येथे येण्याचे नियोजन केले आहे. नऊ टप्प्यांत होणार्‍या निवडणुकीतील सभा, पदयात्रा जवळून पाहण्यासाठी अमेरिका, फ्रान्स, नायजेरिया आणि यूएईमधील पर्यटक विशेषत: वाराणसीला भेट देण्याच्या तयारीत आहेत.
सहा रात्री सात दिवसांचे निवडणूक पॅकेज 1200 डॉलर (72240 रु.)मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये सार्वजनिक सभा, निवडणूक प्रचार, पक्षनेते आणि निवडणूक आयोगातील अधिकार्‍यांच्या भेटीचा समावेश आहे. बहुतांश अनिवासी भारतीय आणि परदेशात स्थायिक झालेल्या गुजराती नागरिकांना वाराणसीतील मोदी विरुद्ध केजरीवाल लढत पाहण्यात रस आहे, अशी माहिती निवडणूक पर्यटनाचे अध्यक्ष मनीष शर्मा यांनी दिली.
गुजरात निवडणुकीत संकल्पना आकारास
2012 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी ही संकल्पना आकारास आली. त्या वेळी 125 विदेशी पर्यटकांनी गुजरातला भेट दिली होती. या वेळी हा आकडा 2000 पर्यंत जाईल, अशी आशा शर्मा यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीतील घडामोडी अनुभवण्याच्या आकर्षणातून विदेशी पर्यटक यात रस दाखवत आहेत. जगातील अन्य देशांपेक्षा भारतातील निवडणुकीत रोमांच, आनंद आणि उत्साह भरलेला असतो. त्यामुळे र्जमनी, फ्रान्स, अमेरिका, यूके, चीन, यूएई, नायजेरिया आणि सिंगापूरमधील पर्यटक येथे दाखल होत आहेत.