आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Navy Names Porbandar Base In Gujarat After Sardar Vallabhbhai Patel

पोरबंदरला नौदलाचे नवे स्थानक विकसित होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता गुजरातच्या पोरबंदर येथे नौदलाचे नवे स्थानक विकसित करण्यात येणार आहे. सागरी गस्तीचे प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या नव्या स्थानकाला आयएनएस सरदार वल्लभभाई पटेल असे नाव देण्यात येणार आहे. गुजरातच्या किनारपट्टीवरील हे दुसरे नौदल तळ असेल. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याच्या विकासासाठी मान्यता दिली आहे.

सागरी सीमांच्या संरक्षणासाठी हा नौदल तळ मोक्याचा ठरेल. त्यामुळे पश्चिम सीमा अधिक सुरक्षित होईल तसेच युद्धनौकांच्या तैनातीसाठी हे स्थान योग्य असल्याचे मत वेस्टर्न नेव्हल कमांडचे जनसंपर्क अधिकारी कमांडर राहुल सिन्हा यांनी व्यक्त केले. २६/११ चा हल्ला, तसेच समुद्रमार्गाने होणारी अमली पदार्थांची वाढती तस्करी पाहता पोरबंदर स्थानक महत्त्वाचे होते, असे सिन्हा म्हणाले.