(फोटो: लंदनमधील 'डिशूम' रेस्तरॉची इमारत)अहमदाबाद- ब्रिटनमध्ये हॉटेल व्यवसायात गुजराती बंधु शमील आणि कवी ठकरार यांनी दबदबा निर्माण केला आहे. शमील आणि कवी ठकरार या दोन चुलत भावांच्या 'डिशूम' या भारतीय रेस्तरॉने ब्रिटेनमध्ये 'सर्वश्रेष्ठ रेस्तरॉ'चा दर्जा प्राप्त केला आहे.
ब्रिटेनमधील 'मिशेल डिनर'ला पछाडत 'डिशूम'ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 'डिशूम' रेस्तरॉ हे मुंबईतील 'इराणी कॅफे'च्या धर्तीवर बनवण्यात आले आहे. 'ऑनलाइन अर्बन सिटी गाइड अॅप्लिकेशन हेल्प'द्वारा करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 'डिशूम'ला सर्वश्रेष्ठ रेस्तरॉचा दर्जा मिळाला आहे.
2010मध्ये सुरु झाले 'डिशूम'
लंडनमध्ये राहाणारे गुजराती बंधु शमील, कवी ठकरार तसेच अमर आणि आदर्श राडिया या चौघांनी 2010 मध्ये लंडनमध्ये 'डिशूम' रेस्तरॉ सुरु केले.
शमील ठकरार पाच वर्षांपूर्वी आजी- आजोबांनी भेटण्यासाठी मुंबईत आले होते. तेव्हा 'इराणी कॅफे' पाहिल्यानंतर 'डिशूम' रेस्तरॉ सुरु करण्याची कल्पना सुचली. ब्रिटनमधील बहुतांश लोक भारतीय व्यंजनाचे चाहते आहेत. या पार्श्वभूमीवर पारंपरिक भारतीय रेस्तरॉ सुरु केले असल्याचे शमील यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांत ब्रिटनमध्ये 3 ठिकाणी 'डिशूम' सुरु झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, PHOTOS....