आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे देशातील पहिले डिजीटल व्हिलेज: दूध-भाजीचे पैसेही कार्डने देतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिलेले डिजीटल इंडियाचे स्वप्न सत्यात उतरण्यास सुरुवात झाली आहे. भारत सरकारच्या डिजीटल इंडिया संकल्पनेंतर्गत गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील आकोदरा देशातील पहिले स्मार्ट गव्हर्नन्स गाव बनत आहे. ICICI बँकेने हे गाव दत्तक घेतले असून येथे स्मार्ट गव्हर्नन्सच्या सर्व सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. आता येथील नागरिक मोबाइल, कॉम्प्यूटर, इ-बँकिंगचा सहजतेने वापर करत आहेत. भाजीपाला खरेदीसाठीही लोक डेबिट कार्डचा वापर करताना दिसत आहेत.
साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर तालुक्यामध्ये आकोदरा गाव आहे. या गावाला वाय-फाय झोन करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. ICICI बँकेच्या सहकाऱ्याने गावाला इ-गव्हर्नन्स आधारित तंत्रज्ञान पुरवले जात आहे.
ICICI बँकेच्या मदतीने लोक गावातील दुध संकलन केंद्रापासून छोटे किराणा दुकान आणि भाजीपाला खरेदीसाठीही तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. अर्थात गावकरी आता कॅशलेस ट्रॅजेंक्शन करत आहेत. त्यामुळे गावात नगदी व्यवहार नसल्यातच जमा आहे. सगळीकडे एटीएम कार्डचा उपयोग केला जात आहे.