आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील एकमेव Toilat Cafe, गुजरात CM च्या जावईबापूंची आयडिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जगात अशा अनेक हॉटेल्स आणि कॅफे आहेत ज्या त्यांच्या वेगळेपणामुळे प्रसिद्ध आहेत. विदेशात तर काही कॅफे असे आहेत जिथे आपण खुर्चीवर नाही तर कमोडवर बसून नाश्ता करत आहोत असे वाटते. याच थिमवर अहमदाबादमध्ये देशातील पहिला कॅफे तयार करण्यात आला. या कॅफेचे नावच 'टॉयलेट कॅफे' असे आहे. हा कॅफे टॉयलेट थिमवर तयार करण्यात आला आहे.

कलामांपासून मोदीं, अमिताभपर्यंत सेलिब्रिटीजने दिली भेट
आनंदीबेन पटेल यांचे जावई येथील सफाई विद्यालयाचे संचालक आहे. याची स्थापना 1967 मध्ये ईश्वरभाई पटेल यांनी केली होती.
सुरुवातीला त्यांनी टॉयलेट थीमवर शाळेचे गार्डन तयार केले होते. यामागे उद्देश होता की मैला वाहण्याच्या प्रथेकडे पाहाण्याचा वाईट दृष्टीकोन बदलला जावा.
आनंदीबेन यांचे जावई जयेश पटेल या सफाई विद्यालयाचे संचालक झाल्यानंतर त्यांनी टॉयलेट थीमवर तयार करण्यात आलेल्या गार्डनलाच कॅफे मध्ये बदलले. त्यांनी टॉयलेट थीमवर कॅफे तयार केला.

कॅफेमध्ये दिवसभर वर्दळ
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतू या कॅफेमध्ये नेहमीच वर्दळ असते. येथील चहा-नाश्त्याची मजा घेण्यासाठी लोक गर्दी करतात.
सेलिब्रिटीजमध्येही हे कॅफे आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, दलाई लामा, अमिताभ बच्चन यांनीही येथे हजेरी लावलेली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अमिताभ बच्चनही पाहून गेलेल टॉयलेट कॅफे