आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे गेले देशाच्‍या पहिल्‍या महिला PM चे बालपण, पाहा INSIDE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद - स्वराज भवन आणि आनंद भवन हे देशाच्‍या स्‍वातंत्र्य लढ्याच्‍या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. इंदिरा गांधी यांचे बालपणही याच स्‍वराज भवनात गेले आहे. ब्रिटीश सरकारविरोधातील धोरणांची आखणी आणि अंमलबजावणीची नितीही याच भवनात ठरत होती. ब्रिटिश पोलिसांनी येथे कित्‍येकदा छापेमारी करून नेहरू परिवारातील सदस्‍्यांना तुरुंगात पाठवले होते. आज 19 नोव्‍हेंबर, इंदिरा गांधी यांचा जन्‍मदिवस, त्‍यानिमित्‍ताने जाणुन घेऊया स्‍वराज भवनाशी संबंधित काही खास बाबी.
- इंदिरा गांधी यांचा जन्‍म स्वराज भवनमध्‍ये 1917 मध्‍ये झाला.
- त्‍यांचे लग्‍न वयाच्‍या 25 व्‍या वर्षी म्‍हणजे 26 मार्च 1942 रोजी आनंद भवनमध्‍ये झाले.
- 14 नोव्‍हेंबर 1969 ला त्‍यांनी आनंद भवनाला जवाहरलाल नेहरू स्मारक निधीसाठी दान केले.
- स्‍वातंत्र्याच्‍या लढाईत आनंद भवन हे कॉंग्रेस आणि सैनिकांचे महत्‍त्वाचे ठिकाण होते.
- अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्‍यापक योगेश्वर तिवारी यांनी आनंद भवनची माहिती दिली.
- असहकार आंदोलन, विदेशी कपड्यांची होळी या घटनांचे साक्षीदार हे भवन आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, ऐतिहासिक भवन आणि नेहरूंचे दुर्मिळ फोटो..