आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indira Gandhi First Female Prime Minister Of India

होळीचा रंग खेळल्‍यामुळे शाळेत इंदिरा गांधी यांना मिळाली होती ही शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - येथील शाळेत शिकणारी एक 10 वर्षाची चिमुकली तेव्‍हा मनसोक्‍स होळीचे रंग खेळली होती. दुस-या दिवशीही तिच्‍या हाताचा रंग निघाला नाही. म्‍हणून चिडलेल्‍या शिक्षकांनी तिला बेंचवर उभे राहण्‍याची शिक्षा दिली. हीच मुलगी पुढे देशाची पहिली महिला पंतप्रधान झाली. होय हा प्रसंग आहे, इंदिरा गांधी यांच्‍या संदर्भातील.
इंदिरा गांधी केवळ दहा वर्षाच्‍या होत्‍या, तेव्‍हा त्‍या अलाहाबादच्‍या एका स्‍कुलमध्‍ये शिकत होत्‍या. सहाजिकच होळीचा सण म्‍हटला की, लहान मुलांमध्‍ये कमालीचा उत्‍साह असतो. इंदिरा गांधीही होळीच्‍या रंगात चिंब भिजल्‍या होत्‍या. सुटीच्‍या दिवशी त्‍यांनी मनसोक्‍स रंग खेळला होता. दुस-या दिवशी चिमुकल्‍या इंदिरा गांधी शाळेत पोहोचल्‍या तेव्‍हा शिक्षक त्‍यांच्‍यावर ओरडले. कारण, इंदिरा यांचे हात दुस-या दिवशीही रंगलेलेच होते. शिक्षकांनी त्‍यांना बेंचवर उभे केले. होळी हा सण इंदिरा गांधी यांना खुप आवडत होता.
देश पारतंत्र्यात होता, तेव्‍हा इंग्रजी शाळांमध्‍ये भारतीय सणांचे महत्‍त्व फार जपले जात नव्‍हते. 25 एप्रिल 1975 ला इंदिरा गांधी यांनी एका पत्रात हा प्रसंग सांगितला आहे. होळीचे रंग खेळल्‍यामुळे शिक्षा मिळाल्‍याचे त्‍यांनी लिहीले होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, इंदिरा गांधी यांच्‍या आयुष्यातील काही प्रसंग..