आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: सैन्यात अधिकारी बनण्याचे होते स्वप्न, मात्र धार्मिक पुस्तक वाचल्यावर बनली साध्वी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडवानी: बडवानी शहराची भाची असलेली इंदूरची निधी डोसी (वय 24) ही 10 वर्षांपूर्वी अत्यंत कडक स्वभावाची होती. तीला आर्मी अथवा नेव्ही ऑफिसर बनायचे होते. मात्र वयाच्या 14 व्या वर्षी तिने तीर्थंकर पुस्तक वाचले आणि तिचे मन पालटले सांसारिक जीवनापासून तीने विरक्त होण्यास सुरूवात केली. ती मागील 8 वर्षांपासून विना तळलेले जेवण आणि गरम पाणी पीत राहिली. आता निधीचे संसारीक जीवनात मन रमत नाही. 8 मे ला गुजरातच्या गीरनारमध्ये निधी साध्वीची दीक्षा घेणार आहे. मंगळवारी निधीचा पहिला वडघोडा बडवानीमध्ये निघाला. परिजन तसेच समाजातील लोकांनी याचा उत्सव साजरा केला, भरपूर नृत्य केले. वैराग्याने तृप्त झालेल्या निधीवर फुले उधळण्यात आली. तर फुलासारख्या नाजून मुलीला वैराग्य धारण करताना पाहून आई वडीलांचे डोळे अश्रूंनी ओले झाले.

निधीचे मामा कीर्ती व नीती कुमार लुंकड यांनी वरघोडा काढून भाचीला आशिर्वाद दिला. ते म्हणाले निधी आम्हा सर्वांचीच खुप लाडकी आहे. कुटुंबाची इच्छा होती की निधीचा पहिला वरघोडा बडवानीमधूनच निघावा. ताई-भावजी यांना विचारणा केली तर त्यांनी परवानगी दिली. निधी लहानपणापासूनच इथे राहीली आहे. श्वेतांबर जैन समाजाचे अध्यक्ष विजय चिप्पड़ यांनी सांगितले की, राजघाट रोड ते शुभम पॅलेसपर्यंत हा वरघोडा काढण्यात आला होता. निधी या रथावर बसून संपूर्ण शहरात फिरली. या शोभा यात्रेनंतर दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


पुढील स्लाईडवर पाहा, निधीच्या वरघोडा समारोहाचे फोटो...