आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात : मटण खाल्ल्याने उर्दू येत नाही किंवा जानवे घातल्याने कोणी ब्राह्मण होत नाही : परेश रावल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - भाजप खासदार परेश रावल यांनी सोमवारी जुन्या सूरतमधील कोट सफिल रोड आणि वराछामध्ये रोड सभा घेतल्या. यावेळी कोट सफिल येथे बोलताना त्यांनी राहुल गांधींवर जहरी टीका केली. ते म्हणाली, हिंदु बनण्यासाठी निघाले आहेत तर मंदिरात जात आहेत, मग नवरात्रीत नऊ दिवसांचे उपवासही करत जा. मटण खाल्ल्याने उर्दू येत नाही अन् जानवे घातल्याने कोणी ब्राह्मण होत नाही, असे यावेळी परेश रावल म्हणाले. 


पाटीदारांच्या गोंधळानंतर निघून गेले 
नाना वराछामध्ये परेश रावल यांच्या सभेच्या अखेरच्या टप्प्यात पाटीदार तरुणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. एका तरुणाला सुरक्षारक्षक स्टेजच्या मागे घेऊन गेले. त्यामुळे पाटीदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. विरोध होत असल्याचे पाहून परेश रावल त्यांच्या ताफ्यासह त्याठिकाणाहून रवाना झाले. त्यानंतर पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना शांत केले. संपूर्ण स्टेजही पाच मिनिटांत काढून टाकले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, काय म्हणाले परेश रावल...

बातम्या आणखी आहेत...