आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात : भाजपच्या 70 उमेदवारांच्या यादीत काँग्रेसच्या पाच बंडखोरांना संधी, 16 नवीन चेहरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजपने आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. ही ७० उमेदवारांची यादी असून त्यात पाच काँग्रेस बंडखोर उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे. विद्यमान ४९ आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे.


प्रदेश भाजपने १६ नवीन चेहऱ्यांना पहिल्या यादीत समाविष्ट केले आहे. काँग्रेसच्या बंडखोरांना संधी मिळाली आहे. राघवजी पटेल, धर्मेंद्रसिंह जडेजा, रामसिंह परमार, मानसिंह चौहान, सी.के. राआेलजी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी देखील हे नेते भाजपबरोबर होते. त्यांना भाजपने आमदारकीचे बक्षिस देण्याचे ठरवलेले दिसते.


राजकोट पश्चिम मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री विजयभाई रुपाणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल महेसाणामधून निवडणूक लढवणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जितूभाई वाघाणी भावनगर (पश्चिम) मतदार संघातून उभे आहेत. दरम्यान, १८२ सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी ९ व १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

 

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत यादीवर शिक्कामोर्तब

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक याच आठवड्यात बुधवारी घेण्यात आली होती. त्यात गुजरातच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर शुक्रवारी ही यादी जाहीर करण्यात आली. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

 

आेबीसींचे प्राबल्य
भाजपच्या पहिल्याच यादीत सर्वाधिक संख्या आेबीसींची आहे. त्यानंतर ठाकूर समाजाचे उमेदवार आहेत. त्यानंतर कोळी समुदायातील उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

70 उमेदवारांच्या पहिल्या यादीतील विश्लेषण.
- 17 पटेल            
- 18 आेबीसी       
- 03 अनुसूचित जाती 
-  11 अनुसूचित जमाती

 

गुजरात विधानसभा 2017 :  BJP ची पहिली यादी 

1) मोठे चेहरे 

 

विजयभाई रुपाणी मुख्यमंत्री
नितिनभाई पटेल उपमुख्यमंत्री
जितुभाई वाघाणी BJP प्रदेशाध्यक्ष
शंकरभाई चौधरी आरोग्य मंत्री
भुपेंद्रसिंह चुडासमा वरिष्ठ नेते 
जयेशभाई रादडीया 2012 मध्ये जेतपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी, 2013 मध्ये भाजपकडून येथेच विजयी. 
विभावरीबेन दवे विद्यमान आमदार 

 

2) SC आणि ST जागा 

मकदारसंघ कॅटेगरी उमेदवार
खेडब्रह्मा ST रमीलाबेन बेचरभाई बारा
भिलोडा ST पीसी बरंडा
जेतपूर ST जयंतीभाई राठवा
डेडियापाडा ST मोदीभाई पी वासवा
झघडिया ST रवजीभाई वासवा
मांगरोल ST गणपतभाई वसावा
वांसदा ST गणपतभाई उलुकभाई महाला
उमरगाम ST रमणभाई नानुभाई पाटकर
गढडा SC आत्मारामभाई परमार
वडोदरा सिटी SC मनीषाबेन वाकिल
बारडोली SC ईश्वरभाई रमणभाई परमार


3) वैशिष्ट्ये.. 

70 उमेदवारांची यादी जाहीर. 

- 49 विद्यमान आमदार 

- 15 पाटीदार

- 5 कांग्रेसमधून आलेले 

- 4 महिला

- 0 मुस्लिम

 

गुरुवारीच अहमदाबादेत आले शहा

- दिल्लीमध्ये बुधवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभेच्या 182 जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित केली. त्यानंतर एक दोन दिवसांत भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार असे स्पष्ट होते. त्यानुसार शुक्रवारी नावे जाहीर करण्यात आली. 
- अमित शाह गुरुवारी अहमदाबादला पोहोचले. त्यांनी पक्षाच्या कार्यालय कमलम येथे मिटींग घेतली. लिस्ट जारी करण्याच्या आधीच शहा डॅमेज कंट्रोल करत आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, भास्करच्या सर्वेक्षणातील गुजरातच्या जनतेचा कल...

बातम्या आणखी आहेत...