आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये थंडावल्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा, आता मतदारांना भेटण्यावर जोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबरला होत आहे. त्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. आता मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यावर पक्षांच्या कार्यकर्त्यांचा जोर असेल. भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी निवडणुकीत संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे.

 

आज नरेंद्र मोदींनी सूरतमध्ये एक सभा घेतली तर मनमोहन सिंग यांनीदेखिल एक पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्ला चढवला. निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सर्व पक्षांचा जोर डोअर-टू‌‌-डोअर कॅम्पेनवर असेल. पहिल्या टप्प्यात राजकोट पश्चिम सीटवरून मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि भावनगर पश्चिममधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघाणी यांच्या मतदारसंघात मतदान होणार आहे. 


पहिल्या टप्प्यात 977 उमेदवार मैदानात 
- पहिल्या टप्प्यात दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रच्या 19 जिल्ह्यांतील मतदारसंघात 9 डिसेंबरला मतदान होईल. 
- यात कच्छ, सुरेंद्रनगर, मोरबी, राजकोट, जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागड, गीर सोमनाथ, अमरेली, भावनगर, बोटाड, नर्मदा, भडूच, सूरत, तापी, डांग, नवसारी, वलसाड जिल्ह्यांचा समावेश असेल. 


एकूण जागा - 182 
पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान 
दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान 

 

पहिल्या टप्प्यात एकूण मतदार 
एकूण मतदार - 2 कोटी 12 लाख 31 हजार 652
पुरुष - 1 कोटी 11 लाख 5 हजार 933
महिला - 1 कोटी 1 लाख 25 हजार 472
सर्वाधिक मतदार कामरेजमध्ये 
सर्वात कमी मतदाप उत्तर सूरतमध्ये 

 

पहिल्या टप्प्यात या 5 नेत्यांवर असेल नजर 
- राजकोट पश्चिम - मुख्यमंत्री विजय रूपाणी
- भावनगर पश्चिम - भाजप प्रदेशाध्यक्ष जीतू वाघाणी
- पोरबंदर - भाजप नेते बाबू बोखिरिया आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया
- मांडवी - कांग्रेसचे शक्तिसिंग गोहिल


पहिल्या टप्प्यात सकाळी 8:00 ते सायंकाळी 5:00 पर्यंत मतदान 
- चीफ इलेक्शन ऑफिसर बीबी स्वॅन यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी प्रचार थांबेल. मतदान नऊ तारखेला सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत असेल. 

 

बातम्या आणखी आहेत...