आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UNKNOWN FACTS : या व्यक्तीमुळे महात्मा गांधीना कळले अहिंसेचे तत्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबरला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गांधीजींचे आयुष्य, स्वातंत्र्यातील योगदान आणि त्यांचे अहिंसेचे विचार सर्वांनाच माहिती आहेत. महात्मा गांधींजी यांच्याबद्दल इतिहासाने बऱ्याच गोष्टींची दखल घेतलेली आहे. मात्र, गांधीजींना अहिंसेचा धडा कुठून मिळाला याबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. 
 
महात्मा गांधी असे व्यक्तीमत्व आहे. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचले. गांधी अहिंसावादी होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला होता. मात्र गांधीजी सुरवातीला अहिंसावादी नव्हते. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल. पण हे खरे आहे. त्यांच्या आयुष्यात अहिंसेचा गुण त्यांना त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी यांच्याकडून मिळाला. 
 
महात्मा गांधी यांचे कस्तुरबा यांच्याशी लहानपणीच लग्न झाले होते. तेराव्या वर्षी कस्तुरबा यांना खूप काही समजत नव्हते, तरीही त्या स्वतंत्र विचारांच्या होत्या. लग्नानंतर कस्तुरबा यांना चुकीचे काहीही सहन होत नव्हते. असा उल्लेख एका वेबसाईटने गेल्यावर्षी लेखात केलेला आहे. 
 
कस्तुरबा गांधींना चुकीचे काम होत असल्यास सहन होत नसायचे. त्या या चुकीच्या गोष्टींचा सामना करायच्या. बालपणी लग्न झाल्याने कस्तुरबा यांनी शिक्षण अर्धवट सोडले होते. मात्र, आपल्या पत्नीला कोणी निरक्षर म्हणावे, याची महात्मा गांधींना चिड यायची. त्यावेळी त्यांनी कस्तुरबा यांना शिकविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, वेळेच्या कमतरतेमुळे हे सर्व प्रयत्न फसले. महात्मा गांधी यांचे कस्तुरबा गांधी यांच्यासोबत प्रेमळ संबंध नसल्याचा खुलासा satyagrah.scroll.in या वेबसाईटवरील एका लेखात करण्यात आला आहे. आंधळ्या प्रेमात मी कस्तुरबा यांना खूप त्रास दिल्याचाही उल्लेख महात्मा गांधींनी केलेला आहे. 
 
मात्र, असंख्य भांडणतंट्यानंतरसुद्धा कस्तुरबा गांधी महात्मा गांधीजींच्या आयुष्यात आधारस्तंभ म्हणून उभ्या होत्या. त्या एकमेव महिला होत्या ज्यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा होतांना जवळून पाहिले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...