Home | National | Gujarat | Gujarat Election Rahul Gandhi Tweet Ninth Question To Narendra Modi

'खेती पर गब्बर की मार, किसान के साथ क्यों सौतेला व्यवहार? राहुल गांधींचा मोदींना 9 वा प्रश्न

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2017, 10:49 AM IST

राहुल गांधींनी मंगळवारी मोदींनी सातवा प्रश्न विचारताना हिशोब चुकवला होता.

 • Gujarat Election Rahul Gandhi Tweet Ninth Question To Narendra Modi
  गुजरात निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर एक प्रश्न विचारत आहेत.-फाइल

  नवी दिल्ली - गुजरात निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर एक प्रश्न विचारत आहेत. गुरुवारी राहुल गांधींनी याच मालिकेतील नववा प्रश्न मोदींना विचारला. त्यात पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या अडचणींबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या प्रश्नात आरोप केला की, शेतीवर लावलेल्या गब्बर सिंग टॅक्स (जीएसटी) मुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाहीए आणि त्यांच्या पिकाला भावही मिळताना दिसत नाही. शेतकऱ्याला अशी सावत्र वागणूक का असे राहुल गांधींनी लिहिले.

  नवव्या प्रश्नात काय म्हणाले राहुल गांधी..
  न की कर्ज माफी
  न दिया फसल का सही दाम
  मिली नहीं फसल बीमा राशि
  न हुआ ट्यूबवेल का इंतजाम
  खेती पर गब्बर सिंह की मार
  छीनी जमीन, अन्नदाता को किया बेकार
  PM साहब बतायें, खेडुत के साथ क्यों इतना सौतेला व्यवहार?

  चुकीच्या पोस्टबाबत राहुल म्हणाले, मी नरेंद्रभाई नाही..

  राहुल गांधींनी सातवा प्रश्न विचारताना पोस्ट केलेल्या चार्टमध्ये प्रत्येक वस्तुची टक्केवारी 100% टक्क्यांनी अधिक लिहिण्यात आली. उदाहरण द्यायचे झाल्यास 2014 मध्ये डाळीचे दर 45 रुपये आणि 2017 मध्ये 80 रुपये प्रति किलो सांगण्यात आले आहेत. या दरानुसार 77% ची वाढ म्हणायला हवे होते, पण त्यांनी तक्त्यात 177% लिहिले. या चुकीवरून टीका झाल्यानंतर राहुल गांधींनी ट्वीट करत लिहिले की, मला भाजपमधील सर्व मित्रांना सांगायचे आहे की, मी नरेंद्रभाईंसारखा नाही, मी माणूस आहे. आपण सर्वच काहा विचित्र चुका करतो, त्यातून जीवन अधिकच रंजक होत जाते. ही चूक दाखवल्याबद्दल आभार, असेच करत राहा. यातून मला सुधारण्यास मदत मिळेल. सर्वांचे आभार.

  ट्विटरवर प्रश्नांची मालिका..
  राहुल गांधी ट्विटरवर 22 वर्षांचा हिशेब मागत एक मालिका चालवत आहेत. त्यावर रोज मोदींना एक प्रश्न विचारत आहेत. गुजरात के हालात पर ‘प्रधानमंत्री जी से सवाल’ लिहून ते प्रश्न ट्विट करतात.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, राहुल गांधींनी मोदींना विचारलेले प्रश्न...

Trending