आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यधीश आहेत माजी PM मनमोहन, आजही घरी आहे 21 हजारांची मारुती 800

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - माजी पंतप्रधान मनमोहनसिंग गुरुवारी राजकोटमध्ये गुजरात निवडणुकीचा प्रचार केला. आपल्या सभेच्या दरम्यान त्यांनी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोटाबंदी आणि जीएसटीवरून टीका केली. तथापि, मनमोहनसिंग यांच्या घरी आजही तीच मारुती 800 उभी आहे, जी त्यांनी 1996 मध्ये 2.4 लाखांत खरेदी केली होती. आता तिची किंमत 21 हजार रुपये आहे. DivyMarathi.Com ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेटची डिग्री घेणाऱ्या या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याशी निगडित काही फॅक्ट्स आपल्या वाचकांना सांगत आहे.

 

मोदींच्या एकूण संपत्तीहून दुप्पट आहे मनमोहन यांचे बँक बॅलेन्स
> 2014 मध्ये आपली पंतप्रधानपदाची खुर्ची नरेंद्र मोदींना सोपवणारे मनमोहनसिंग सध्या आसामातून राज्यसभा सदस्य आहेत. त्यांनी शेवटची मे 2013 मध्ये आपली संपत्ती घोषित केली होती. त्यांच्याद्वारे सबमिट केलेल्या शपथपत्रानुसार ते 11.6 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
> शपथपत्रानुसार मनमोहनसिंग यांचे बँक बॅलेन्स तब्बल 4 कोटी रुपये आहे. यात त्यांचे 8 फिक्स्ड डिपॉझिट आणि 4 बँक अकाउंट सामील आहेत. त्यांच्या पत्नीचे चंदिगडमध्ये असलेल्या बँक अकाउंटही यात आहे.
> दुसरीकडे, सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेवटची 2016 मध्ये आपली संपत्ती घोषित केली होती. त्यांची एकूण संपत्ती 1.75 कोटी रुपये आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी निगडित फॅक्ट्स...

बातम्या आणखी आहेत...