Home »National »Gujarat» Nomination For Candidates In Gujarat Assembly Elections

गुजरात : आजपासून भरले जाणार उमेदवारी अर्ज, BJP-काँग्रेसने अजनही जाहीर केली नाही नावे

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 11:28 AM IST

सूरत - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 21 तारखेपर्यंत उमेदवारांनी त्यांची उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारांना प्रतिज्ञापत्रासह 21 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी असेल. 22 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार आहे. 24 नोव्हेंबरपर्यत अर्ज मागे घेता येतील. मात्र भाजप आणि काँग्रेसने अजूनही उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाही.

उमेदवारी अर्जात बदल नाही, प्रतिज्ञापत्रात फोटो गरजेचा
- विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी भरायच्या फॉर्ममध्ये काहीही बदल केलेला नाही.
- गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही उमेदवारी दाखल करणाऱ्यांना खरी ती माहिती द्यावी लागेल.
- प्रतिज्ञापत्राबरोबरच यावेळी उमेदवारांना फोटोही लावावा लागेल. सूरतचे निवडणूक अधिकारी सीपी पटेल म्हणाले की, व्यवस्थापनाने काही दिवसांपूर्वीच राजकीय पक्ष आणि पदाधिकाऱ्यांना बोलावून उमेदवारी अर्ज कसा भरायचा याबाबत माहिती दिली होती. कोणत्या प्रकारची चुकी झाल्यास फॉर्म रद्द होऊ शकतो हेही सांगण्यात आले होते.

NRI ना मतदान करताना पासपोर्ट दाखवावा लागणार
- 26 दिवसांनंतर होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत एनआरआयना मतदान करण्यासाठी पासपोर्ट दाखवावा लागणार आहे.
- मतदारांकडे आयडी कार्ड नसेल तर पर्यायी 12 डॉक्युमेंट्सपैकी एक दाखवून मतदान करता येईल.
- 12 पर्यायी डॉक्युमेंट्समध्ये ड्रायव्हींग लायसन्स, राज्य सरकार किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीने जारी केलेले आयडी कार्ड, बँक किंवा पोस्टाचे पासबूक, पॅन कार्ड, आरजीआय अंतर्गत मिळणारे स्मार्टकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, पासपोर्ट, हेल्थ इन्श्युरन्सचे स्मार्ट कार्ड, पेन्शन डॉक्युमेंट्स, खासदार-आमदाराने दिलेले आयडी कार्ड यांचा समावेश आहे.

उद्याप उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत..
- विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होईल. पण दोन्ही मुख्य पक्षांनी अद्याप उमेदवारांची नावेच जाहीर केलेली नाहीत.
- भाजपच्या सुत्रांच्या मते, पार्टीने सर्व 182 जागांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. 15 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील सर्व जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली जाऊ शकतात.
- काँग्रेसनेही पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारांच्या नावाची यादी 16 नोव्हेंबरला जारी करणार असल्याचे सांगितले आहे.

Next Article

Recommended