आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात विधानसभा 2017 : पाटीदारांची साथ गरजेची का, किती जागांवर आहे समाजाचा प्रभाव?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - 1980 च्या दशकापासून पाटीदार भाजपच्या पाठिशी राहिलेले आहेत. सौराष्ट्र-कच्छच्या 54 जागांवर पाटिदारांचा प्रभाव आहे. सीएसडीएसच्या सर्वेक्षणानुसार 2012 च्या निवडणुकांमध्ये 75% पाटिदारांनी भाजपच्या बाजुने मतदान केले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही पाटीदारांनी साथ दिली होती. पण 2015 च्या  आरक्षण आंदोलनानंतर पाटिदारांवरील पकड सैल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता अमित शहांच्या टीमसमोर सर्वात मोठे आव्हान पाटिदारांना मॅनेज करणे हे आहे. तर काँग्रेससाठी पाटीदारांची नाराजी वोट बँकेत बदलण्याचे आव्हान असेल. गुजरातच्या 182 विधानसभा जागांसाठी 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल 18 डिसेंबरला निकाल येणार आहे. 


सौराष्ट्र-कच्छच्या 54 जागांवर 9 डिसेंबरला मतदान  
- सौराष्ट्र-कच्छच्या 54 जागांवर 9 डिसेंबरला मतदान होणार आहे. कच्छ भाजपचा बालेकिल्ला आहे. येथे एकूण सहा जागा आहेत. 2007 आणि 2012 मध्ये भाजपने 5-5 जागा जिंकल्या होत्या. तर 2012 च्या पोटनिवडणुकीत अबडासाची जागा भाजपच्या हातून निसटली होती. 
- 1985 मध्ये 182 पैकी 149 जागांवर विजय मिळवत काँग्रेस सत्तेत आले होते. त्यानंतर मात्र गुजरात निवडणुकीत काँग्रेसला पुनरागमन करता आले नाही. 


2017 मध्ये वर्चस्वाची लढाई.. 
- या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, दोन्ही मोठे पक्ष वर्चस्वाची लढाई लढत आहेत. पराभव काँग्रेसला मृत्यू शय्येवर नेईल. तर भाजपचा पराभव त्याच्या विकासाच्या मुद्द्यावर मोठे प्रश्नचिन्हं असेल. दुसरीकडे हार्दिक आणि जिग्नेशसारखे नेते पुन्हा स्वतःचे अस्तित्व शोधत एखाद्या पक्षाच्या मागे फिरताना दिसेल.


2012 पासून पाटीदार गेले भाजपपासून दूर, सौराष्ट्रमध्ये 7 जागांचे नुकसान 
- 2012 मध्ये केशुभाई यांच्यामुळे भाजपला 23 जागा गमवाव्या लागल्या होत्या. गुजरात परिवर्तन पार्टीला अवघ्या 2 जागा म्हणजे, 3.9% मते मिळाली होती. 
- सौराष्ट्रात भाजपला 7 जागांचे नुकसान झाले होते. तसे पाहता, पाटीदार आंदोलनाचे स्वरुप केशुभाई यांच्या बंडखोरीपेक्षा मोठे आहे. 2012 मध्ये सौराष्ट्रात भाजपला 7.9% अधिक मते मिळाली होती. 2017 च्या निवडणुकीत 3 ते 4% कमी मते मिळाली तरी भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. 


50,247 मतदान केंद्र, मतदार वाढले 
राज्यात एकूण 50,128 मतदान केंद्र होती. पण यावेळी मतदारांची संख्या वाढल्याने 119 नवी मतदान केंद्रे तयार केली आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 50,247 मतदान केंद्र असतील. मुख्य निवडणूक अधिकारी बीबी स्वान यांनी सांगितले की, इनकम टॅक्स डिपार्टमेंटने 50 लाख नकदी, 7.33 कोटींचे सोन्या-चांदिचे दागिने जप्त केले आहेत. 48,857 शस्त्रे जप्त केली आहेत. त्याशिवाय 28,425 जणांना अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहेत. 


शहांचे डॅमेज कंट्रोल सुरू 
- दिल्लीमध्ये बुधवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभेच्या 182 जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. एक दोन दिवसांत भाजप उमेदवारांची यादी जाहीर करेल. 
- अमित शाह गुरुवारी अहमदाबादला पोहोचले. त्यांनी पक्षाच्या कार्यालय कमलम येथे मिटींग घेतली. लिस्ट जारी करण्याच्या आधीच शहा डॅमेज कंट्रोल करत आहेत. 

 

ओबीसी, आदिवासी आणि दलितांवर नजर 
आमच्या सुत्रांच्या मते भाजपने ओबीसी, आदिवासी आणि दलित समाजावर लक्ष केंद्रीत केले आहेत. अमित शहा यांच्या दक्षिण गुजरात, मध्य गुजरात आणि उत्तर गुजरातच्या दौऱ्यात या समाजांच्या नेत्यांची विशेष उपस्थिती जाणवली. अमित शहांनी दलित, आदिवासी समाजाच्या विविध नेत्यांबरोबर बैठका केल्या. 


आंदोलनानंतर निर्माण झाली निवडणुकीची स्थिती 
- पाटीदार आंदोलनानंतर सौराष्ट्र-कच्छच्या 4 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत विसावदर, अबडासा काँग्रेसने जिंकले होते. सौराष्ट्रच्या 8 पैकी 1 जिल्हा परिषदेतही काँग्रेसचा विजय झाला होता. 
- त्याशिवाय 23 जिल्हा परिषदा आणि 113 ग्राम पंचायतींमध्येही काँग्रेसला विजय मिळाला होता. या निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने भाजप विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कसा आहे पाटीदारांचा प्रभाव..

बातम्या आणखी आहेत...