Home »National »Gujarat» Rahul Gandhi To Begin His Tour Gujarat Tour From Today News And Updates

गब्बरसिंग टॅक्स हा जीएसटी होईपर्यंत शांत बसणार नाही; राहुल गांधी यांची गुजरातेत टीका

दिव्य मराठी नेटवर्क | Nov 12, 2017, 00:29 AM IST

प्रांतिज (गुजरात)-गब्बरसिंग टॅक्स जोपर्यंत १८ टक्क्यांच्या सर्वोच्च मर्यादेच्या जीएसटीत परावर्तित होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. आमच्या वारंवार सांगण्यावरून आणि छोट्या दुकानदारांच्या दबावानंतरच जेटलींनी २८ टक्क्यांच्या श्रेणीतून अनेक वस्तू बाहेर केल्या. ५ श्रेणी म्हणजे गब्बरसिंग टॅक्स असून एक कर म्हणजेच जीएसटी असेल, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

शनिवारी गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनदिवसीय ‘नवसृजन यात्रा’च्या चौथ्या टप्प्यास प्रारंभ केला. या वेळी मोदी सरकारवर जोरदार टीका करत राहुल म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींचे सरकार आणि त्यांचे कार्यालय एका बंद इमारतीसारखे असून तिथून जनतेचा आवाज ऐकून घेतला जात नाही. ते फक्त मन की बात करतात.’ एका सभेत गुजराती भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करत ते म्हणाले, निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान गुजरातेत येत आहेत. अमित शहा, निर्मला सीतारमण, योगी आदित्यनाथही येत आहेत. तरीसुद्धा निवडणुकीत भाजप मात्र येणार नाही.
राहुल गांधी साबरकांठा जिल्हा मुख्यालयाच्या हिंमतनगरमध्ये पोहोचतातच पालिकेजवळ उभे असलेल्या युवकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. शिवाय “मोदी मोदी’ अशा घोषणाही दिल्या.

उत्तर गुजरातच्या 32 जागांवर नजर
उत्तर गुजरात कांग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. याठिकाणच्या 32 पैकी 17 जागा काँग्रेसकडे आहे. राहुल गांधींचा हा दौरा 9 ते 11 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. हिमाचल प्रदेश निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांसाठी दौरा पुढे ढकलला होता.
पुढील स्‍लाईडवर पहा अन्‍य फोटो...

Next Article

Recommended