आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा निवडणूकीत पटेल अर्ध्या मताने विजयी, बाद झालेल्या मतांविरुद्ध कोर्टात जाणार भाजप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर/नवी दिल्ली- गुजरातमधूननिवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विजय मिळवून काँग्रेस नेते सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी भाजपला धक्का दिला. संपूर्ण शक्ती पणाला लावूनही भाजप पटेल यांचा विजय रोखू शकला नाही. इतर दोन जागांवर अपेक्षेनुसार भाजप अध्यक्ष अमित शहा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी विजयी झाल्या. शहा इराणी यांना प्रत्येकी ४६, पटेल यांना ४४ मते पडली. ३८ मते घेतलेले बलवंतसिंह मात्र पराभूत झाले.  मत बाद झालेल्या निर्णयाच्या विरुद्ध भाजपने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

रात्री रंगले नाट्य...
या निवडणुकीत मतदानादरम्यान दोन बंडखोर काँग्रेस आमदारांची मते निवडणूक आयोगाने रात्री उशिरा अवैध ठरवली. शिवाय, या दोन मतपत्रिका वगळून इतर मतांची मोजणी सुरू करावी, असे आदेशही आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, भाजपने निकालावर आक्षेप घेतल्याने मतमोजणी रात्री उशिरापर्यंत रखडलेली होती. रात्री दोनच्या सुमारास निकाल जाहीर झाला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. 

काँग्रेस आमदारांनी सेकंद शहांना दाखवली मतपत्रिका, ९.३० तासानंतर मतमोजणी सुरू 
नियम :
राज्यसभानिवडणुकीत मतदारास मतपत्रिका पक्षाच्या अधिकृत मतदान प्रतिनिधीला दाखवावी लागते. यानंतरच ती मतपेटीत टाकावी लागते. 

घडले असे... राघवजीपटेल भोलाभाई गोहिल यांनी सेकंद मतपत्रिका अमित शहांना दाखवली. काँग्रेसचे मतदान प्रतिनिधी शक्तिसिंह गाेहिल यांनी ते पाहिले. पक्षाने आधी मतदान अधिकारी निवडणूक आयोगाकडे दोघांची मते रद्द करण्याची मागणी केली. 

काँग्रेसच्यायुक्तिवादाला ठोस प्रतिवाद करण्यात भाजप अपयशी 
मतदानाचा व्हिडिओ काँग्रेसच्या बाजूने होता. रणदीप सुरजेवाला, पी.चिदंबरमसह नेत्यांनी तीन वेळा आयोगाकडे कागदपत्रे सादर केली. हरियाणा राजस्थानमधील अशा प्रकरणांचा हवाला दिला. भाजपने युक्तिवादाचा प्रतिकार करण्याऐवजी केवळ मतमोजणी सुरू करण्याची मागणी केली. 

यामुळे ‘त्या’ रद्द मतांना आले महत्त्व 
पटेलयांना विजयासाठी ४५ मतांची गरज होती. पक्षाच्या ४३ आमदारांची मते त्यांना मिळाली. जदयू एनसीपीचेही १-१ मत धरले तर होतात ४५ मते. मात्र, जदयूचे मत कुणाला मिळाले याबद्दल संशय आहे. काँग्रेसच्या आमदारांची भाजपला मिळालेली मते रद्द झाली म्हणून विजयासाठी ४४ मतेच आवश्यक होती.

पुढे काय : दाद मागण्यासाठी भाजप काेर्टात जाणे शक्य 
भाजपया संपूर्ण प्रकरणास उच्च न्यायालयात आव्हान देण्याची दाट शक्यता आहे. आमदारांच्या अवैध मतांच्या प्रकरणासही ते कोर्टात नेऊ शकतात. 

पटेल यांच्या इशाऱ्यावरून झाले अवैध मतदान? 
सूत्रांच्या मते, भोलाभाई गोहिल आणि राघवजीभाई पटेल यांचे मत अवैध ठरवण्यामागे अहमद पटेल यांचाच हात आहे. दोघांनीही भाजपला मत देण्यापूर्वी मतपत्रिका शक्तिसिंह गोहिल यांना तसेच काही सेकंदासाठी अमित शहा यांना दाखवणे योगायोग नाही. दोन्ही मते बाद व्हावी आपला विजय निश्चित व्हावा, भाजपला त्यांच्याच जाळ्यात अडकवण्यासाठी पटेल यांनी हा डाव रचल्याचे कळते. पटेलांच्या विजयाचा गुजरातच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होईल. विपरीत परिस्थितीतही मिळालेल्या या विजयामुळे काँग्रेसचा विश्वास दुणावला आहे. वर्षअखेर होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत यामुळे फायदा होऊ शकतो. काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी पटेलांची दावेदारी मजबूत होईल. 
बातम्या आणखी आहेत...