आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या बाबतीत लवकरच करणार डबल सेंच्युरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी धडाक्यात प्रचार सभा घेत आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर सर्वाधिक वेळ ते देत आहेत ते गुजरात निवडणुकीला... गुजरातमध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मोदींनी 16 सभा घेतल्या होत्या. यात त्यांनी 14 हजार कोटींच्या महत्वाकांक्षी योजनांच्या घोषित केल्या आहेत. याच राज्यात मोदींच्या 37 प्रचार सभा होणार आहेत. अर्थातच मोदी एकूण 50 सभा घेत आहेत. पीएम झाल्यानंतर त्यांनी 17 राज्यांत 170 प्रचार सभा घेतल्या आहेत. गुजरात निवडणुकीच्या सभा आधीच्या प्रचार सभांशी जोडल्यास मोदी लवकरच प्रचार सभांची डबल सेंच्युरी करणार आहेत. 

 

बिहारमध्ये सर्वाधिक सभा
> पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी 17 राज्यातील विधानसभा निवडणुकींसाठी 170 प्रचार सभांना संबोधित केले आहे. यापैकी सर्वाधिक 31 सभा त्यांनी एकट्या बिहार विधानसभा निवडणुकीत घेतल्या. 
> ते रविवारपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सलग दोन दिवस ते राज्यभर सभा घेणार आहेत. यात भरुच आणि सुरेंद्रनगरसह सीएम विजय रुपाणी यांचे मतदार संघ राजकोट पश्चिमचा देखील समावेश आहे. 

 

गुजरातेत आतापर्यंत 8 प्रचार सभा
मोदींनी गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली, तेव्हापासून 8 प्रचार सभा घेतल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान होण्यापूर्वी ते आणखी काही जिल्ह्यांचे दौरे करणार आहेत. पीएम मोदींनी 17 राज्यांमध्ये प्रचार घेतल्या. त्यापैकी 9 राज्यांत भाजपचा विजय झाला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदींच्या कोणत्या राज्यात किती प्रचार सभा...

बातम्या आणखी आहेत...