आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे दिसेल मोदींच्या गावातील नवे रेल्वे स्टेशन, 99.81 कोटी रुपये झाले मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शहर वडनगरला टूरिस्ट स्पॉटच्या रूपात विकसित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने जोरदार तयारी केली आहे. नरेंद्र मोदी जेथे एकेकाळी चहा विकत होते, त्या जागेला आज पूर्ण जग ओळखत आहे. आता या रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचे ठरत आहे. सप्टेंबरमध्ये आपल्या जन्मदिनी पंतप्रधान याचे लोकार्पण करण्याची शक्यता आहे. 
 
99.81 कोटी रुपये झाले मंजूर
गुजरात टुरिझम कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर जेनू देव म्हणाले, महेसाणा जिल्ह्यातील वडनगर आणि आसपासच्या स्थानांना टुरिस्ट स्पॉटच्या रूपात विकसित करण्यात येईल. यासाठी 99.81 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी केंद्राच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत करण्यात येईल. 
 
असे असेल रेल्वे स्टेशन
8 कोटी रुपयांच्या निधीद्वारे रेल्वेस्टेशनचे आधुनिकीकरण करण्यात येईल. रेल्वे स्टेशनची निर्मिती कीर्ती तोरणाच्या डिझाइनसारखी असेल. यात रेस्ट रूम, पार्किंग, कँटीन अशा प्रमुख सुविधा असतील. 
 
वडनगरच का?
वडनगर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शहर आहे. याच वडनगरच्या रेल्वेस्टेशनवर ते आपल्या वडिलांसोबत चहा विक्री करायचे. याबाबत खुद्द मोदींनी त्यांच्या अनेक सभांमधून सांगितले आहे. याशिवाय वडनगरचे ऐतिहासिक महत्त्वही आहे. येथे कीर्ती तोरण, तानारीरीची समाधी, हाटकेश्वर मंदिर आणि शर्मिष्ठा तलाव अशी पर्यटनस्थळे पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. येथे बौद्धकालीन अवशेषही आहेत, यामुळे वडनगरचे ऐतिहासिक महत्त्व वाढले आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये चित्ररूपातून पाहा, कसे असणार आहे विकसित वडनगर... 
बातम्या आणखी आहेत...