आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतीचे होते शेजारणीशी संबंध, मग पत्नीने धडा शिकवण्यासाठी उचलले हे पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - मोरबीच्या जवळ एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यात पत्नीला जेव्हा कळले की, तिच्या पतीचे शेजारणीशी अवैध लैंगिक संबंध आहेत, तेव्हा तिनेही शेजारणीच्या पतीशी फिजिकल रिलेशन बनवले. यानंतर पत्नीने पतीविरुद्ध रेप, व्यभिचार, हुंड्यासाठी छळ इत्यादी कलमांखाली एफआयआर दाखल केली. शेवटी दोन्ही पक्षांमध्ये सहमतीने घटस्फोट होऊन दोघांनीही एकमेकांच्या पत्नीशी लग्न केले.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
अंकित पटेल (बदललेले नाव) याचे लग्न जिज्ञा पटेल (बदललेले नाव) हिच्याशी 9 वर्षांपूर्वी झाले होते. लग्नानंतर ते मोरबीच्या नाना टाऊनमध्ये राहत होते. यादरम्यान अंकित शेजारी राहणारी विवाहिता वर्षा (बदललेले नाव) हिच्यावर प्रेम करू लागला. दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. याची माहिती जिज्ञाला कळताच तिने पतीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने शेजारणीच्या पतीशीच लैंगिक संबंध बनवले.

 

पतीविरुद्ध लिहिली एफआयआर
- जिज्ञाने पतीविरुद्ध रेप, व्यभिचार, हुंड्यासाठी छळ इत्यादी कलमांखाली हडवद पोलिसांत रिपोर्ट दाखल केली. यानंतर दोन्ही पक्षांत समेटाने प्रकरण सोडवण्याचे ठरले. यानुसार दोन्ही महिनलांनी आपापल्या पतींना घटस्फोट दिला अन् प्रियकरांशी लग्न केले. यानंतर जिज्ञाने पोलिसांत दिलेली तक्रार परत घेतली.

 

दोन्ही युगुलांमध्ये विचित्र समाधान
- हायकोर्टासमोर याचिकेद्वारे तक्रारीत म्हटले गेले की, एकाच सोसायटीत दोन्ही महिला राहतात. दोन्ही पक्षांमध्ये सहमतीने प्रकरण मिटले आहे. आता दोन्ही महिला आपल्या पतीला घटस्फोट देऊन आपल्या प्रियकरासह मर्जीने राहत आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमध्ये पाहा, पूर्ण प्रकरण....

बातम्या आणखी आहेत...