आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी समुद्रात वाढली नौदलाची ताकद, INS सरदार पटेल सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोरबंदर (गुजरात) - अरबी समुद्रातील नौदलाचा नवा तळ आयएनएस सरदार पटेलचे आज लोकार्पण करण्यात आले. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी हा तळ नौदलाकडे सुपूर्द केला.

का आहे महत्त्वाचा ?
नौदालाशी संबंधीत सूत्रांच्या माहितीनुसार, गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर तयार करण्यात आलेल्या आयएनएस सरदार पटेल नौदल तळामुळे अरबी समुद्रावर नजर ठेवणे आता अधिक सोपे होणार आहे. गुजरातमध्ये 880 नॉटिकल मील (22.2 किलोमीटरचे 12 नॉटिकल मील होते) समुद्र किनारा आहे. एवढेच नाही, गुजरातला लागून पाकिस्तानची 532 किलोमीटर सीमा आहे.
- हा नौदलाचा पहिला तळ आहे ज्याला देशातील एखाद्या राजकीय नेत्याचे नाव आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांनी आयएनएस सरदार पटेलचे लोकार्पण केले.
औपचारिकरित्या हा तळ नौदलाला सुपूर्द केला. यावेळी नौदलाचे चीफ अॅडमीरल आर.के.धवन उपस्थित होते. नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी.के.शर्मा यांनी सांगितले, की पोरबंदर येथे समुद्र किनाऱ्यावर एयरक्राफ्ट कॅरियर आयएनएस विराट, आयएनएस कोलकाता आणि दिल्ली, टँकर दिपक, अण्वस्त्रांनी सज्ज सहा बोटींसह अनेक महत्त्वाच्या गोष्टी तैनात असतील.
आयएनएस सरदार पटेल लोकार्पण सोहळ्याशी संबंधीत आणखी छायाचित्रे पुढील स्लाइडवर
बातम्या आणखी आहेत...