आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Story: नितीन पटेल दिवसभर मुलाखती देत राहिले, सायंकाळी रुपाणींची CM पदी निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरात मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा झाली तर, नितीन पटेल यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. - Divya Marathi
गुजरात मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा झाली तर, नितीन पटेल यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.
अहमदाबाद (गुजरात) - गुजरातमध्ये शुक्रवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजय रुपाणी नवे मुख्यमंत्री होणार आहेत तर नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्रीपदी बोळवण करण्यात आली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातची धुरा आनंदीबेनच्या खांद्यावर देण्यात आली होती. तीनवर्षात त्यांना बदलून 60 वर्षांच्या विजय रुपाणी यांना आणण्यात आले आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी बैठकांचे सत्र सुरु होते. सकाळपासून नितीन पटेल यांचे नाव आघाडीवर होते. त्यांच्या घरात विशेष पुजेचेही आयोजन झाले. त्याशिवाय त्यांनी काही टीव्ही चॅनल्सलाही मुलाखती दिल्या. मिठाईचे वाटप सुरु होते. सायंकाळी चार वाजता अचानक परिस्थिती बदलली...

> आपले नाव नक्की झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नितीन पटेल यांनी भावी सीएमचा अजेंडा काय असेल याबद्दल मीडियामध्ये मुलाखती देण्यास सुरुवात केली. पण सायंकाळी चार वाजता अचानक वातावरण पालटले.
> दोन तासानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा झाली. रुपाणी यांच्या नावाला भाजपाध्यक्ष अमित शहांची पसंती असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे पायउतार झालेल्या आनंदीबेन या नितीन पटेल यांच्यासाठी आग्रही होत्या.
> दोन दिवसांपूर्वी झालेल्या घोषणेनुसार विधीमंडळ पक्षनेत्याची निवड आमदारांच्या बैठकीत करण्याचे ठरले होते. मात्र त्यासाठीची बैठक दोन तास उशिरा सुरु झाली. त्याआधी वरिष्ठ नेत्यांची वेगळी बैठक झाली आणि त्यामध्येच गुजरातच्या मुख्यमंत्र्याच्या निवड झाली. आमदारांच्या बैठकीत त्या नावाची फक्त औपचारिक घोषणा झाली.

दोन तासांत ठरले रुपाणींचे नाव
> सायंकाळी चार वाजता अमित शहा, आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्री आणि गुजरात निरीक्षक नितीन गडकरी, पक्षाच्या महासचिव सरोज पांडे, प्रभारी दिनेश शर्मा आणि संयुक्त सचिव व्ही. सतीश यांची बैठक झाली.
> या बैठकीत आनंदीबेन आणि शहा यांच्यात वादळी चर्चा झाली. शहा नितीन पटेल यांच्या नावाला होकार देण्यास तयार नव्हते.
> यामुळे चिडलेल्या आनंदीबेन यांनी शहांवर त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा आरोप केला. मोदी केंद्रात गेल्यानंतर प्रथमच गुजरातचा वाद चव्हाट्यावर आला होता.
> आनंदीबेन पटेल यांनी आरोप केला, की पाटीदार आंदोलन हा सरकार अस्थिर करण्याच्या षडयंत्राचाच एक भाग होता.
> दरम्यान, व्ही. सतीश बैठकीतून बाहेर गेले आणि त्यांनी मोदींशी संपर्क केला. त्यानंतर नितीन पटेल यांना उपमुख्यमंत्री करण्याचा फॉर्म्युला समोर आले.
मोदींचे तीन संकेत
> गुजरातमध्ये आगामी निवडणूक ही 'पटेल फॅक्टर' ऐवजी 'मोदी फॅक्टर'वरच लढली गेली पाहिजे.
> मोदींना कोणत्याही जातीय दबावापुढे झुकणे पसंत नाही.
> जो सर्वात वेगाने पुढे जाईल, स्वतःला बेस्ट समजेल, तो मागे राहील.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शहांसमोर नाही झुकले नितीन पटेल
> म्यानमारमध्ये जन्मलेले रुपाणी आणीबाणीत होते जेलमध्ये
बातम्या आणखी आहेत...