आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थानिक कन्येने बनवला स्वदेशी ज्युरासिक पार्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद:‘पॅलेस ऑन व्हील महाराजा’ही शाही रेल्वे गुजरातमध्ये फक्त बालासिनोरलाच येते. त्याचे कारण म्हणजे बालानसिनोरचा राजवाडा आणि रॅओली डायनोसर पार्क. या दोन्हीही बाबींशी ४३ वर्षीय आलिया सुलताना यांचा निकटचा संबंध आहे. त्या पूर्व बालासिनोरच्या संस्थानिक घराण्यातील राजकुमारी असून रॅओली डायनासोर पार्क बनवणाऱ्या प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांनी या उद्यानाला दिलेल्या मूर्तरूपामुळे लोक त्यांना ‘डायनासोर प्रिंसेस’ म्हणतात. बालासिनोरच्या या उद्यानाला भारताचे ‘ज्युरासिक पार्क’ संबोधले जाते. हा देशातील पहिला आणि जगातील दुसरा डायनासोर पार्क आहे. कॅनडाच्या हिस्ट्री पार्कचा जगात पहिला क्रमांक लागतो. रॅओली डायनासोर पार्क अहमदाबादपासून ९० किमी अंतरावर अाहे. जगातील अन्य ज्युरासिक पार्कमध्ये डायनासोरची ४० ते ४५ टक्के हाडे, अंडी आणि जीवाश्म आहेत. मात्र, रॅओलीमध्ये हे प्रमाण ७५ टक्के आहे.  
 
 पार्कच्या विकासासाठी गुजरातच्या पर्यटन विभागाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीत आलिया या एकमेव गैर-सरकारी सदस्य आहेत. ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्या म्हणाल्या, विज्ञान, जीवशास्त्राशी माझा काहीएक संबंध नाही. तरीही मला ही आवड आहे. १९८१ मध्ये येथे डायनोसारची हाडे, अंडी तथा अवशेषांच्या उत्खननासंबंधी सर्वेक्षण सुरू होते. तेव्हा, भूगर्भशास्त्रज्ञ आमच्याकडेच मुक्काम करायचे. मला त्यांच्या कामाचे कौतुक वाटायचे. म्हणूनच मी रॅओली गावातील आमच्या मालकीच्या जमिनीवर जायची. तेव्हा विदेशातून माझे काही मित्र आले होते आणि त्यांनी रॅओलीला जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा डायनासोर आणि त्यांच्या उत्पत्ती स्थानाबाबत मला काहीच माहीत नव्हते. माझ्या मनातही जिज्ञासा निर्माण झाली आणि येथूनच माझा डायनासोर अवशेष संरक्षणाबाबतचा प्रवास सुरू झाला. १९८७-८९ मध्ये डायनासोरबद्दल माहिती मिळवणे खूप कठीण होते. पण, या क्षेत्रातील संशोधनात मला भूगर्भशास्त्रांचे मार्गदर्शन आणि मदत मिळाली. या क्षेत्रातील संशोधक त्यांच्या लघुशोध प्रबंधांबाबत माझ्याशी चर्चा करायचे.त्यामुळे माझी जिज्ञासाही वाढतच गेली.  आता मला डायनासोरबद्दल संपूर्ण ज्ञान आहे. पार्कमध्ये येणाऱ्यांना डायनासोर, त्यांची उत्पत्ती, विनाश अशी सर्व माहिती देते. पार्कला जागतिक स्तरावरील पर्यटन उद्यान बनवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.
 
 आलिया यांचे वडील नवाब मोहम्मद सालाजार खान बाबी हे बालासिनोरचे नवाब होते. १९४७ पर्यंत तेथे  बाबी नवाब यांचीच सत्ता होती. मुघलांसोबत अफगाणिस्तानातून आलेल्या पठाणांपैकीच बाबी एक होत. सुरुवातीला दिल्ली आणि त्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये वास्तव्य केले. आलिया पार्कसोबतच बालासिनोरमध्ये एक शाळाही चालवतात. भूगर्भ तज्ज्ञांच्या मते, सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या डायनासोरचे अवशेष या ठिकाणी सापडल्याचे एका शोधकार्यातून स्पष्ट झाले आहे. यात डायनासोरचे कातडेही असून त्यास स्पर्श केल्यास मखमलासारखा भास होतो. हे पार्क ७२ एकर परिसरात पसरलेले आहे.
बातम्या आणखी आहेत...