आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी गुजरातमधील \'गीर\' या जंगलात होते फक्‍त 20 सिंह...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- गुजरातमधील जगप्रसिध्‍द 'गीर' या अभयारण्‍याची आठवण झाली की, डोळ्यासमोर येतो सिंहांचा समुह. दक्षिण अफ्रिकेनंतर सिंहाचे माहेरघर म्‍हणून 'गीर' या जंगलाची जगभरात ओळख आहे. वन्‍य- जीवांच्‍या रक्षणासाठी 1969 मध्‍ये गीर 'अभयारण्य' म्हणून घोषित करण्‍यात आले. 140.4 वर्ग किलोमिटर क्षेत्रफळ असणा-या गीर या अभयारण्‍याचा विस्‍तार करून त्‍याला राष्‍ट्रीय उद्यानाची मान्‍यता देण्‍यात आली. या अभयारण्‍याचा विस्‍तार 258.71 वर्ग किलोमीटर करण्‍यात आला आहे. ऐकेकाळी फक्‍त 20 सिंह असणा-या या अभयारण्‍यात आजघडीला तब्‍बल 411 सिंह आनंदाने बागडताना पर्यंटकांना पाहायला मिळतात.
जगातील सर्वात हिंस्‍त्रपशू म्हणून सिंह या प्राण्‍याला जगभर ओळखले जाते. मोठ्या उत्सुकतेने व अपेक्षेने या सिंहाचे दर्शन घेण्‍यासाठी जगभरातील पर्यटक या ठिकाणी येतात. या अभयारण्‍यामध्‍ये पर्यटक मोठ्या संख्‍येने येतात. नबाबांनी 1913 मध्‍ये या जंगालीत सिंहाची शिकार करण्‍याचे सत्रच चालवले होते. फक्‍त 20 सिहं या अभयारण्‍यात शिल्‍लक राहिले होते.
देशी नवाब आणि त्‍यांनतर भारतात आलेले इंग्रज यांनी मोठ्या प्रमाणावर सिंहांची शिकार केल्‍यामुळे सिंहांच्‍या अस्तित्‍वाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. याच काळात सिंहांना वाचविण्‍यासाठी दोन व्‍यक्‍तींनी पुढाकार घेतला. 112 वर्षोंपूर्वी सिंहाचे रक्षण केल्‍यामुळेच आज गीरच्‍या जंगलाचे वैभव टिकून आहे.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या या दोन व्‍यक्‍तींविषयी.......