आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 700 मुलांच्या शाळेत एकमेव शिकलेली मुलगी आज बनली मुख्यमंत्री!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- गुजरातच्या महसूलमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आज दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उत्तर गुजरातमधील खरोड गावातील मुलगी आनंदीबेन पटेल यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याचबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही राज्यपाल कमला बेनीवाल यांनी गुप्ततेची शपथ दिली. आनंदीबेन यांच्या पितृ परिवारात दहा भाऊ-बहिण आहेत. त्यात चार भाऊ व सहा बहिणी आहेत. त्या लहानपणापासूनच शिक्षणाबाबत कमालीच्या गंभीर होत्या. त्यामुळेच प्राथमिक शाळेत शिक्षण घेताना त्या 700 मुलांत त्या एकमेव मुलगी होत्या.

शिक्षण घेत असतानाच त्या शेती कामात मदत करीत असत. वडील शेतकरी होते. वडील जेठाभाई तर माता मेनाबेन यांनी अतिशय हलाखीच्या व संघर्षमय जीवन जगत आपल्या मुलांना शिक्षण दिले व जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र दिला. खरोड महेसाणा जिल्ह्यातील विजापूर तालुक्याचा भाग आहे. उल्लेखनीय म्हणजे नरेंद्र मोदी यांचे मूळगाव वडनगर हे सुद्धा महेसाणा जिल्ह्यातच मोडते.
पुढे वाचा, आनंदीबेन यांनी मुलांना नदीतून बुडताना वाचविले....