आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1000 वर्षे जुनी राणीची अनोखी विहिर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटण (गुजरात) - उत्तर गुजरातच्या पाटण येथील प्राचीन, नक्काशीदार आणि अनोख्या अशा राणीच्या विहिरीचा (स्टेपवेल) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. याआधी 2004 मध्ये पंचमहाल जिल्ह्यातील चंपानेर-पावागड किल्ल्याचा समावेशही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला होता. कतारची राजधानी दोहगा येथे सुरू असलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 38 व्या परिषदेत रविवारी याची घोषणा करण्यात आली. आर्कियॉलॉजी ऑफ इंडियाच्या वडोदरा येथील कार्यालयाचे अधीक्षक शिवानंद राव यांनी या बैठकीत सहभाग घेतला.

यूनेस्को ने आयकॉमॉस नावाच्या संस्थेवर या विहिरीच्या अंतर्गत निरीक्षणाची जबाबदारी सोपवली होती. या संस्थेने युनेस्कोला पाठवलेल्या आहवालात याचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले होते.
इ.स. 1022-1063 या काळात निर्मिती
या सात मजली विहिरीची निर्मिती इ.स. 1022 ते 1063 या काळात झाल्याचे मानले जाते. राजवंशातील तत्कालीन राणी उदयमती यांनी पति भीमदेव यांच्या स्मरणार्थ या विहिरीची निर्मिती केली होती. सुमारे सात शतके ही मौल्यवान वास्तू गाळात रूतलेली होती. भारतीय पुरातत्व खात्याने अत्यंत अनोख्या पद्धतीने या वास्तुचे संवर्धन केले आहे.
जल व्यवस्थापनाचा अजोड नमुना
ही विहिर म्हणजे तंत्रज्ञानाचे एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचे मानले जाते. भूमीगत जल वापर आणि जल व्यवस्थापनाचा हा अजोड नमुना असल्याचे मत युनेस्कोने व्यक्त केले आहे. त्यामुळेच याचा वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राणीच्या विहिरीशिवाय दक्षिण कोरियातील नामहंसानसियोंग, चीनचे ग्रँड कॅनॉल आणि सिल्क रोड याचाही वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
( वास्तुचे सर्व फोटो फाईल फोटो आहेत. )
पुढील स्लाइड्समध्ये पाहा या अनोख्या वास्तुची छायाचित्रे व इतर माहिती