आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Standard Railway Station Build In Surat

VIDEO - सुरतमध्ये होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्टेशन, अंदाजे खर्च 3000 कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरतः खाद्य पदार्थ, हिरे आणि कपडा उद्योगासोबतच आता सुरत अत्याधुनिक रेल्वे स्थानकामुळेही ओळखले जाईल असे आयोजन नगर पालिकेने केले आहे. सुरत रेल्वे स्टेशनच्या जागेवर पी.पी.पी (पब्लिक प्राइवेट पार्टनरशीप) मॉडेल अंतर्गत 3000 कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्टेशन उभे करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरत रेल्वे स्टेशनचे क्लेवर बदलण्यासोबतच यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून यामध्ये अत्याधुनिक बिल्डींग उभी करण्याचा सुनियोजित प्लान केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि पीएमओ यांच्या समोर सादर करण्यात आला आहे.
शहरातील आर्कीटेक्ट संजय जोशी यांनी तयार केलेले या प्रेझेन्टेशनला पाहिल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने फास्ट ट्रॅक प्रकल्पांमध्ये या प्रकल्पाला लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठीचा हिरवा कंदील दाखवला आहे. एकदा या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या चार वर्षातच 2500 ते 3000 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर सुरत रेल्वे स्टेशनची चमक बदलून जाईल. सुरत रेल्वे स्टेशन हे देशभरात एक उदाहरण म्हणून दाखवले जाईल असे नगर पालिकेला वाटते.
- अंदाजे 3000 कोटी खर्च
- संपूर्ण प्रकल्प पुर्ण होण्यासाठी लागतील 4 वर्षे
- 1 कोटी स्क्वेअर फुटमध्ये होणार बांधकाम
- 60 मंजल्याचे 5 टॉवर उभे केले जाणार
- 140 प्लॅटफॉर्म असलेला अंडरग्राऊंड बस डेपो बनणार
पुढील स्लाईडवर पाहा, या रेल्वे स्थानकाचे फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर पाहा या स्टेशनचा व्हिडीओ...