आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशरत बनावट चकमक प्रकरणी आयपीएस अधिकारी पी.पी. पांडेय फरार घोषित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - इशरत जहां बनावट चकमक प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुजरातचे आयपीएस अधिकारी पी.पी. पांडेय यांना फरार घोषित केले.


विशेष सीबीआय न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एच.एस. खुडवाड यांनी सीआरपीसी कलम 82 अंतर्गत अतिरिक्त पोलिस महासंचालक(गुन्हे) पी.पी. पांडेय यांना फरार घोषित केले आहे. त्यांना 31 जुलैपर्यंत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या पांडेय यांना बनावट चकमक प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे. इशरत व अन्य तिघे लष्कर-ए-तैयब्बाचे सदस्य असल्याची माहिती पांडेय यांनी पोलिसांना दिली होती. संबंधित आरोपी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचत असल्याचे त्यांना सांगितले होते.15 जून 2004 रोजी इशरत जहां,जावेद शेख ऊर्फ प्रनेश पिल्ले, ए.ए. राणी आणि जीशान जोहर यांना बनावट चकमकीत ठार करण्यात आले. पांडेय अटक टाळत असल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात यावे, अशी मागणी सीबीआयने केली होती.