आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युसूफच्या लग्नाचे इरफानकडून मोदींना निमंत्रण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- क्रिकेटर इरफान पठानने आपला भाऊ युसूफ पठानच्या लग्नासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. इरफानने मोदींची शुक्रवारी भेट घेऊन लग्नाचे निमंत्रण दिले. युसूफ पठाणचे येत्या 27 मार्च रोजी मुंबईत लग्न होत आहे.


राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इरफानने मोदींना चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या होत्या. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी माहिती दिली की, मोदी शक्यतो लग्नसमारंभ टाळतात मात्र युसूफच्या लग्नाला जाण्याची त्यांची इच्छा आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत इरफान पठाणने मोदी यांचा प्रचार केला होता. मात्र इरफान-युसूफ बंधू सध्या भारतीय संघाच्या बाहेर आहेत.