आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'स्टॅचू ऑफ युनिटी\'साठी देशभरातून आलेले लोखंड निकृष्ट, वापरण्यावर प्रश्नचिन्ह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा- 'पोलादी पुरुष' सरदार वल्लभभाई पटेल यांचे गुजरातमधील बडोदा येथे 'स्टॅचू ऑफ यूनिटी' नावाने भव्य स्मारक उभारले जाणार आहे. येथे उभारल्या जाणार असलेल्या पुतळ्यासाठी देशभरातून लोखंड गोळा करण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांनी कष्टातून कमावलेले आणि वल्लभभाईंच्या पुतळ्यासाठी दिलेले लोखंड वापरायचे की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देशाभरातून पाठवण्यात आलेल्या लोखंड निकृष्ट दर्जाचे असल्याचे निर्मात्या कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे देशभरातून आलेले लोखंड अन्य स्मारकासाठी वापरले जाईल, असे या कंपनीने म्हटले आहे. 'स्टॅचू ऑफ यूनिटी'च्या जवळच हे स्मारक उभारण्‍यात येणार आहे.
'वेबसाइट'वर दिली माहिती...
अधिकृत वेबसाइट http://www.statueofunity वर दिलेल्या माहितीनुसार, 'स्टॅचू ऑफ युनिटी'साठी देशभरातून पाठवण्यात आलेले लोखंड 'फाउंडेशन' तयार करण्‍यासाठी वापरले जाईल. प्रकल्पाचे मुख्य अभियंता के.व्ही. संघवी यांनी सांगितले की, देशभरातून मिळालेले लोखंड 'स्टॅचू ऑफ युनिटी'साठी वापरायचे की नाही, याबाबत अंतिम निर्णय सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता परिषद घेणार आहे. कारण, हा देशातील जनतेच्या भावनांचा प्रश्न आहे. परंतु, देशभरातून आलेले लोंखड निकृष्‍ट दर्जाचे आहे. त्यामुळे हे लोखंड एका वेगळ्या 'आर्ट वर्क' बनवण्यासाठी करण्‍यात येण्याची शक्यता आहे.
देशभरातून प्राप्त झालेल्या लोखंडाचा दर्जा सुमार आहे. त्यामुळे हे लोखंड पाहून आम्ही समाधानी नाही. त्यामुळे या लोखंडाचा वापर 'स्टॅचू ऑफ युनिटी'साठी करता येणार नसल्याचे संघवी यांनी म्हटले आहे.
देशातील जनतेच्या भावनांचा सन्मान करायचाच झालाच एका मोठ्या तांत्रिक प्रक्रियेतून जावे लागेल. यासाठी एक स्वतंत्र स्ट्रक्चर अथवा आर्ट वर्क उभारले जाईल. परंतु, यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मुख्य पुतळ्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे लोखंड आवश्यक आहे.

दरम्यान, सरदार वल्लभ पटेल यांच्यां पुतळ्यासाठी देशभरातून 1,69,078 लोखंड किट्स प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक किटमध्ये 700 ग्रॅम लोखंड आहे. प्राप्त झालेले लोखंड बडोद्यातील 'छानी' कंपनीत ठेवण्यात आले आहे.

सर्व्हेचे काम सुरु...
'स्टॅचू ऑफ युनिटी'साठी सर्वेचे काम सुरु झाले आहे. ‘लाइट अॅण्ड शेडो’सर्व्हेत प्रत्येक ऋतुत हा पुतळा कसा दिसेल, याशिवाय 'टनल टेस्ट' करण्यात येणार आहे. प्रकल्पात अनेक गोष्टी अशा आहेत की, अद्याप त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचे संघवी यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, असा असेल 'स्टॅचू ऑफ युनिटी'