आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातेतून अटक केलेल्या संशयितांना ISIS ने सांगितले होते, असे काही करा की अल्लाह खूश होईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोघे भाऊ सोशल मीडियावर अतिशय अॅक्टिव्ह राहात होते. (फाइल फोटो) - Divya Marathi
दोघे भाऊ सोशल मीडियावर अतिशय अॅक्टिव्ह राहात होते. (फाइल फोटो)
अहमदाबाद - राजकोट येथे आयएसआयएसच्या दोन संशियतांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. वसीम आणि नईम रामोडिया असे या दोघांचे नाव असून ते सख्खे भाऊ आहे. दोघांनीही बीसीए व एमसीए केले आहे. गुजरातमधील काही धार्मिक स्थळावर बॉम्बस्फोटांची मालिका घडवण्याचा त्यांचा कट होता. त्याआधीच एटीएसने त्यांना ताब्यात घेतले आहे. हे दोघे भाऊ चार वर्षांपासून आयएसच्या हस्तकांच्या संपर्कात होते. तीन महिन्यांपासून गुजरात एटीएस त्यांच्यावर नजर ठेवून होते. 
 
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित वसीम आणि नईम रामोडिया हे दोघेही शिक्षित आहेत. एक भाऊ एमसीए तर दुसऱ्याने बीसीए केले आहे. सोशल मीडियावर दोघेहकी अॅक्टिव्ह राहात होते.
- व्हॅलेन्टाइन डेला भावनगरमध्ये ब्लास्ट करण्याची त्यांची प्लॅनिंग होती. मात्र कडक पोलिस बंदोबस्तामुळे त्यांची योजना पूर्ण होऊ शकली नाही.
- ISISशी संबंधितांवर गुजरातमध्ये ही पहिली कारवाई आहे. पोलिस त्यांची कसून चौकशी करीत आहे. देशातील आणखी किती शहरांमध्ये आयएसचे नेटवर्क आहे, याचाही शोध घेतला जात आहे.
- एनआयए दोन महिन्यांपासून गुजरातमधील हलचालींवर नजर ठेवून होते. त्यानंतर दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. 
- एनआयएने गेल्या वर्षी यूपीमधून मुफ्ती अब्दुल कादरीला अटक केली होती. त्याचेही दोन्ही भाऊ आयएसच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. 
 
पत्नी म्हणत होती, अडथळा आणतील त्यांचे शीर कलम करा 
- वसीमची पत्नी शाहीन त्याला कायम चिथावणी देत होती. त्यानंतर त्याने चोटीला येथे बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता. त्यासाठी तो चोटीला येथे गेला होता. मात्र तिथे असलेली सुरक्षा व्यवस्था पाहून त्याचे अवसान गळाले. त्याने घरी फोन करुन सांगतिले की बेचैनी वाढली आहे. वाटत नाही की काम पूर्ण होईल. 
- त्याचा विश्वास वाढवत शाहीन म्हणाली होती, ही लढाई काफिरांसोबत आहे. घाबरू नको. अल्लाह तूला मदत करेल. काम पूर्ण करुन ये.
- शाहीनने वसीमला असेही सांगितले, होते की जर कोणी व्यत्यय आणला. बॉम्ब प्लांट करण्यात अडथळा आणला, चौकशी केली तर तिथेच त्याचे शीर कलम कर. 
- त्यासाठी वसीमने चोटीला येथून दोन चाकू खरेदी केले होते. एटीएसने तेही जप्त केले आहेत.
- एटीएसने पती-पत्नीमधील हे संभाषण ट्रेस केले होते. मात्र शनिवारी एटीएसने फक्त दोघा भावांना अटक केले. शाहीनला ताब्यात घेतले नाही.
 
वडील होते क्रिकेट पंच, म्हणाले- माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ 
- आयएसच्या हस्तकांशी संपर्कात असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेल्या वसीम आणि नईमचे वडील आरिफ रामोडिया सौराष्ट्र विद्यापीठात नोकरीला होते. त्याचवेळी ते क्रिकेट पंच म्हणूनही काम करत होते. आरिफ म्हणाले, मुलांच्या कृत्याने माझ्यावर आत्महत्येची वेळ आणली आहे.
 
यूपीतील मुफ्तीच्या कॉल डिटेल्सने मिळाले धागेदोरे 
- एनआयएने उत्तर प्रदेशातील कासम काजमीला अटक केली होती. त्याचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर वसीमचा नंबर मिळाला होता. त्याला ट्रेस केल्यानंतर एनआयएला कळाले होते की वसीमचे रोल मॉडेल लादेन आणि बगदादी आहे. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...