आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishrat Jahan News In Marathi, Gujarat Ministers, Crime

इशरत जहॉं एन्काऊंटरचे भूत मोदी सरकारच्या मानगुटीवर, माजी मंत्र्यांची चौकशी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इशरत जहॉं एन्काऊंटर प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुजरातच्या माजी मंत्र्यांविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाला कमकुवत कसे करावे, यावर माजी मंत्री चर्चा करतानाची ऑडिओ सीडी सीबीआयच्या हाती पडली असल्याने गुजरात सरकारच्या संकटांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याला आणखी हवा मिळण्याची शक्यता आहे.
इशरत जहॉं एन्काऊंटर प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने स्थापन केलेली विशेष चौकशी समिती अहवाल सादर करण्याच्या एक दिवसापूर्वी गुजरातच्या तत्कालीन मंत्र्यांनी यावर चर्चा केली होती. हे प्रकरण कसे कमकुवत करावे, यावर ही चर्चा झाली होती. त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग सीबीआयच्या हाती लागले आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये हे रेकॉर्डिंग करण्यात आले होते.
एकंदर 70 मिनिटांची ही सीडी असून यात उल्लेख असलेल्या मंत्र्यांना चौकशीसाठी सीबीआयकडून समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे.
गुजरात पोलिसांकडून मुंबईतील 19 वर्षिय मुलगी इशरत जहॉंसह चौघांचा एन्काऊंटर करण्यात आला होता. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट इशरत जहॉं आणि तिच्या साथिदारांनी रचला होता, असा आरोप यावेळी करण्यात आला होता.