आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishrat Jahan Was Not Terrorist And Four Officers Had Opposed Her Encounter

दहशतवादी नाही; अपहरणाची साक्षीदार होती इशरत? सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - जून 2004 मध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये मारली गेलेली इशरत जहाँ दहशतवादी नाही तर, गुप्तचर विभागाच्या एका अपहरणाची प्रमुख साक्षीदार होती? त्यामुळेच तिला मारले गेले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणी विशेष कोर्टात आज सायंकाळी (बुधवार) आरोपपत्र दाखल केले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार इशरतने गुप्तचर विभागाच्या लोकांना अमजद अली राणाचे अपहरण करताना पाहिले होते. त्यामुळेच तिला बनावट एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार या आरोपपत्रात गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी राजेंद्र कुमार आणि मोदींचे अतिशय जवळचे आणि भाजप महासचिव अमित शाह यांच्यासह एकाही नेत्याचे नाव घेण्यात आलेले नाही. आरोपपत्रात माजी आयपीएस अधिकारी जी.एल.सिंघल आणि इशरतच्या एन्काऊंटरचे नेतृत्व करणारे डी.जी. वंजारा, एन.के. आमीन, पी.पी.पांडे यांच्या नावांचा समावेश आहे.

आरोपपत्रात सीबीआने बनावट एन्काऊंटरच्या आधीच्या घटनांची माहिती दिली आहे. आयबीने सर्वप्रथम दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली. त्यानंतर इशरत आणि तिच्या एका मित्राला ताब्यात घेण्यात आले. या चौघांना आयबीने दोन ते तीन आठवडे ताब्यात ठेवले होते. या ऑपरेशनचे प्रमुख राजेंद्र कुमार होते. त्यांच्यासोबत दोन-तीन कनिष्ठ अधिकारीही होते. आयबीच्या टीमने नंतर या चौघांना गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले. गुजरात पोलिसांनी इशरतला सोडून दिले होते मात्र, काही दिवसांनंतर तिला पुन्हा बोलावून घेतले. तिला अहमदाबादच्या एका निर्जन स्थळी बोलावण्यात आले होते. तिथे पोलिस जावेद, अमजद आणि जौशीन यांच्यासह उपस्थित होते. याच ठिकाणी चौघांना मारण्यात आले आणि त्यांच्याजवळ शस्त्र असल्याचे दाखवण्यात आले. गुजरात पोलिसांनी असाही दावा केला की, हे चौघे लष्कर-ए-तोएबाचे दहशतवादी होते आणि नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी अहमदाबादला आले होते.

इशरत दहशतवादी नसल्यामुळे गुन्हे शाखेच्या चार अधिका-यांनी तिच्या एन्काऊंटरला विरोधही केला होता. इशरत शिवाय ज्या तिघांना मारण्यात आले ते मात्र, दहशतवादी होते. ते नरेंद्र मोदींना मारण्यासाठी नाही तर, अहमदाबादमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होते.

इशरतसह चारही जण पोलिसांच्या हाती लागणे आणि त्यांना एन्काऊंटरमध्ये मारण्यापर्यंतचा सर्व घटनाक्रम तपशीलवार समोर येत आहे.
केंद्रीय गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचे दहशतवादी मुजम्मिलचा फोन ट्रेस करत होते. याच दरम्यान माहिती मिळाली की, जीशान जौहर नावाचा दहशतवादी 26 एप्रिल 2004 रोजी अहमदाबादमध्ये आला असून तो गोता हाऊसिंग बोर्ड येथे मुक्कामाला आहे. दरम्यान, मुजम्मिलाचा फोन ट्रेस करणे सुरूच होते. त्याचवेळी माहिती मिळाली की, पुण्याचा अमजद अली राणा कालूपुल- अहमदाबाद रेल्वेस्टेशन समोरील हॉटेलमध्ये 27 मे पासून थांबला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चौघांना 15 जून 2004 ला अहमदाबादच्या पूर्व भागात मारण्यात आले.

वास्तविक वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या आरोपींनी अहमदाबादमध्ये दहशतवादी हल्ल्याचे षडयंत्र रचत असल्याचा खुलासा पोलिसांकडे केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

यांनी केला होता इशरतच्या एन्काऊंटरला विरोध

गिरीश सिंघल, तरुण बारोट, नरेंद्र अमीन आणि के.एम. वाघेला या अधिका-यांनी इशरत दहशतवादी नसल्याने तिच्या एन्काऊंटरला विरोध केला होता. मात्र, वंजारा आणि राजेंद्र कुमार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठीच ते अहमदाबादमध्ये आले असल्याची बनावट कथा रचली होती.