आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishrat Jahan Was Not Terrorist And Four Officers Had Opposed Her Encounter

आरोपपत्रात नाव नसले तरी, इशरत \'मर्डर\' केसमध्ये अडकू शकतात नरेंद्र मोदी ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - इशरत जहाँ एन्काउंटर प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या आरोप पत्रात गुजरातच्या राजकीय नेत्यांची नावे आली नसली तरी, राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालिन गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील संशय कमी झालेला नाही.

भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी आज (गुरुवार) पक्षाच्या संसदीय मंडळाच्या सदस्यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या डोक्यात मात्र, सीबीआयच्या पुरवणी आरोपपत्राचाचा विचार घोळत राहाण्याची शक्यता आहे. या आरोपपत्रात गुप्तचर खात्याचे (आयबी) संचालक राजेंद्र कुमार यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इशरत जहाँ एन्काउंटर संबंधी पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाऊ शकते.

माध्यमांमध्ये मोदी आणि राजेंद्र कुमार यांची ओळख असल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. या वृत्तानुसार राजेंद्रकुमार हिमाचल प्रदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम पाहात होते तेव्हापासून मोदी आणि त्यांची ओळख आहे.