आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishrat Was A Lashkar Terrorist, It Is Real Encounter, Not Fake Wanjara

तो एन्काऊंटर \'फेक\' नव्हताच, इशरत पाक अतिरेक्यांसोबत काय करीत होती?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी डीआयजी डी जी वंजारा - Divya Marathi
माजी डीआयजी डी जी वंजारा
अहमदाबाद- 15 जून 2004 रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये इशरत जहाँसह चार दहशतवाद्यांसोबत झालेली ती चकमक खरीच होती. आज डेव्हिड हेडलीने दिलेल्या साक्षीने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी प्रतिक्रिया या चकमकीचे नेतृत्त्व करणारे गुजरातमधील माझी डीआयजी डी जी वंजारा यांनी दिली आहे.
इशरत जहाँ एन्काऊंटर फेक असल्याचे सांगत वंजारा यांच्यासह 7 लोकांना आरोपी करण्यात आले होते. सध्या सर्वजण जामिनावर बाहेर आहेत. सीबीआयने वंजारा यांना मुख्य आरोपी ठरवले आहे. तसेच अहमदाबादच्या टीमला तेच लीड करीत होते व एन्काऊंटरचे प्लॅनिंग वंजारा यांनीच केले होते व त्यांनीच हे सारे घडवून आणले होते असे आरोपपत्र सीबीआयने वंजारांवर दाखल केले होते. मात्र, 2013 साली त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. वंजारा आता निवृत्त झाले आहेत.
मात्र, इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोय्यबाची सुसाईड बॉम्बर होती व महिला विंगची ऑपरेटिव्ह होती असा खुलासा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली यांनी केला. यानंतर गुजरातमधील आरोप असलेल्या पोलिस अधिका-यांनी वंजारा यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले.
वंजारा म्हणाले, इशरत जहाँ एन्काऊंटर फेक नव्हते. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो. मात्र यात राजकीय हस्तक्षेप असल्याने आम्ही काहीच करू शकतो. मात्र, आज हेडलीच्या दाव्याने याला पुष्टी मिळाली आहे. गुजरात पोलिसांनी पक्की माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही कारवाई केली. इशरत जहाँ हिच्याबद्दल सांगितले गेले की, ती लहान (19) होती, कॉलेजमध्ये शिकत होती. मग असे असेल तर ती पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत काय करीत होती. आम्ही तिचा एकट्याचा तर एन्काऊंटर केला नाही. फक्त तिचाच एन्काऊंटर केला असता तर तशी शंका घेण्यास वाव होता. मग बाकीच्या दहशतवाद्यांबाबत कसे काय बोलले जात नाही. राजकीय कट करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले व आम्हाला तुरुंगात डांबले. मात्र, अखेर सत्य समोर आले असून, हेडलीच्या खुलाशाने इशरत लष्करसाठी काम करीत होती हे स्पष्ट झाल्याचे वंजारा यांनी सांगितले. वंजारा यांच्यासमवेत या प्रकरणातील आरोपी असलेली पोलिस अधिकारी उपस्थित होते.
पुढे वाचा, एन्काऊंटर प्रकरणात कोणते कोणते पोलिस अधिकारी होते?...