आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: गुजराती वंशाचा होता ISIS आत्मघातकी हल्लेखोर तल्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडौदा (गुजरात)- अहमदाबाद-बडौदा हायवेवर असलेल्या भरुच जिल्ह्यातील मेसराड गावातील वातावरण बुधवार दुपारी अचानक बदलले. या गावात पहिल्यांदाच पोलिसांच्या अनेक गाड्या शिरल्या. त्या बघून गावातील लोकांच्या मनात भयकंप माजला. काय झाले असेल, असा प्रश्न सर्वांना पडला. तेव्हा समजले, की इराकच्या ऑइल रिफायनरीजवळ झालेला आत्मघातकी हल्ला करणारा गावातील दाऊद पटेल यांचा नातू तल्हा असलम होता. तल्हा असलम दहशतवादी होता.
तल्हाचे दादा दाऊद पटेल मेसराड गावात राहायचे. 1968 मध्ये दाऊद यांनी दोन मजली घर भाऊ अहमद पटेल यांचा मुलगा मुश्ताक पटेल याला विकले. त्यानंतर ते ब्रिटनला स्थायिक झाले. लंडनमध्येच त्यांची मुले इस्माईल, सलमा आणि शहिदा यांचा जन्म झाला.
1990 मध्ये दाऊद मेसराड येथे आले होते. त्यांना इस्माईलचा निकाह करायचा होता. त्याचा निकाल कंबोई गावातील नूरजहां हिच्यासोबत झाला. या दोघांना पाच मुले झाली. त्यांची नावे तल्हा, यासीन, युसुफ, दाऊद आणि मरिअम अशी आहेत. या सर्वांचा जन्म लंडनला झाला. गेल्या 12 वर्षांपासून अहमद पटेल यांचा इस्माईलच्या कुटुंबाशी काही संपर्क नाही.
याबाबत दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस आयुक्त हिमांशू शुक्ल म्हणाले, की तल्हाच्या कुटुंबाबाबत भरपूर माहिती मिळाली आहे. त्याचे आजोबा आणि आजी गुजरातमध्ये राहत होते. पण तल्हाचा जन्म लंडनलाच झाला.
तल्हाचा मृत्यू, मुंशी बेपत्ता
ब्रिटनच्या पोलिसांनी सांगितले आहे, की 13 जून रोजी इराकमधील ऑईल रिफायनरी उडवण्यासाठी तल्हा शरीरावर बॉम्ब बांधून गेला होता. यावेळी झालेल्या चकमकीत तल्हाने स्वतःला उडवून दिले. यात तल्हासह दहा लोकांचा मृत्यू झाला. तल्हा केवळ 17 वर्षांचा होता. तल्हा त्याचा मित्र हसन मुंशी याच्यासोबत तुर्की फिरायला गेला होता. पण त्यांनी घरच्यांना खोटे सांगितले होते. दोघांना आयएसआयएसमध्ये भरती व्हायचे होते.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, मुंशीही आहे गुजराती....