आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गगनच्या’ मदतीने रेल्वे होणार सुरक्षित; नेव्हिगेशन प्रणालीचा लवकरच वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- इस्रो अर्थात भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या मदतीने भारतीय रेल्वेला अधिक सुरक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी गगन नामक नेव्हिगेशन प्रणालीचा वापर करण्यास इस्रोकडून तयारी दर्शवण्यात आली आहे.

रेल्वे रुळांवर फाटक नसलेल्या ठिकाणी ही यंत्रणा उपयोगी ठरणार आहे. त्याचबरोबर क्रॉसिंगच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसलेल्या ठिकाणाची योग्य वेळी माहिती पुरवण्याचे काम इस्रोच्या मदतीने शक्य होणार आहे, असे इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. गगन ही भारतीय बनावटीची नेव्हिगेशन यंत्रणा आहे. इस्रो आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ही यंत्रणा विकसित करण्यात आली. धोक्याच्या ठिकाणाचा इशाराही मिळतो.

अपघात टळतील
रेल्वे रुळांवर अधिक पाणी असेल किंवा दरड कोसळल्याची घटना घडली असल्यास त्याची पूर्वसूचना रेल्वे चालकाला देणे शक्य होऊ शकेल. रुळांची नेमकी स्थिती त्यातून स्पष्ट होणार असल्याने पावसाळ्यातील दुर्घटना टाळता येऊ शकतील.
बातम्या आणखी आहेत...