आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO - सरपंचाच्या जग्वार कारची बसला धडक, ताशी 200 किमी होता वेग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरतः महिला तलाठीसोबत मिळून लाखो रुपयांचा टॅक्स गैरव्यवहारात सामिल असलेल्या हजिरा येथील सरपंच योगेश पटेल यांची जग्वार कारला 31 डिसेंबरच्या रात्री अपघात झाला. या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कार डिझेल भरवण्यासाठी हजीरा रोडवर जात असताना चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले. ताशी २०० किमी वेगाने जात असलेली ही कार रस्त्याच्या दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला असलेल्या एका बसला जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की, कारमधील चालकासमवेत असलेले दोन प्रवाशांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला.
इच्छापोरा गावातील सरपंच योगेश भगवान पटेल यांची जग्वार कार (क्र. जीजे- 5- जेएफ- 7045) मधून प्रवास करताना चालक अन्नो कुंभार 31 डिसेंबरच्या रात्री 9 वाजता निघाला होता. चालकासमवेत त्याच्या कॉलनीतील विपुल पटेल (वय28) याच्यासोबतच इतर तीन चार जण प्रवास करत होते. या अपघातामुळे कारच्या मागील सीटावर बसलेल्या विपुल पटेल गंभीर जखमी झाला आहे. विपुलला उपचारासाठी जवळपासच्या लोकांनी अडादण भागातील बाप्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रुग्णालयात विपुलला मृत घोषीत करण्यात आले. विपुलचे भाऊ चेतन इश्वर पटेल याने इच्छापोरा पोलिस स्टेशनमध्ये या बद्दल गुन्हा दाखल केला आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, या अपघाताची काही क्षणचित्रे...