आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भौतिक सुख-सुविधा आणि गृहस्थ जीवनाचा त्याग करून साध्वी बनली श्वेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: दीक्षा स्विकारताना श्वेता राठोड)

सुरत- गुजरातमधील सुरत येथील रहिवासी श्वेता राठोड (वय 22) हिने भौतिक सुख-सुविधा आणि गृहस्थ जीवन त्यागून संन्यास घेतला आहे. जैन समाजातील हजारों लोकांच्या उपस्थितीत जैनाचार्य यशोवर्मसुरीश्वर महाराजांनी श्वेताला दीक्षा दिली.
सोमवारी नववधुचा साज केलेल्या मुमुक्षु विसिद्धेश मालाश्रीने व्यासपीठावरून कुटुंबियांना अभिवादन केले. सगळ्यांचा माफी मागून गृहस्थ जीवन त्याग केल्याचे जाहीर करून साध्वी बनण्याची परवानगी घेतली. नंतर डोक्यावर शुभ्र वस्त्रांचे गाठोडे घेऊन काही साध्वीसोबत निघून गेली. मुंडण करून शुभ्र वस्त्रे परिधान करून व्यासपीठावर आलेल्या श्वेता राठोड हिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

आचार्य यशोवर्मसुरीश्वर महाराजांनी नंतर श्वेताला दीक्षा दिली. नंतर श्वेताचे 'विसिद्धेश मालाश्री' असे नामकरण करण्‍यात आले. नंतर उपस्थितांनी साध्वी श्वेतावर पुष्पांचा वर्षाव केला.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा फोटो...