आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन संत म्हणाले, कोलकाता ते अहमदाबाद पायी येणार, 8 महिने लागतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- जैन संत आचार्य कीर्ति यशसूरीश्वरजी महाराज सध्या कोलकात्यात आहेत. अहमदाबाद कोर्टात त्यांच्याविरुद्ध मंगळवारी सुनावणी झाली. एका बालकाला जबरदस्तीने दीक्षा दिल्यामुळे कीर्ती यशसूरीश्वरजी महाराजांवर गुन्हा दाखल आहे.

मागील सात सप्टेंबरला कोर्टांने कीर्ती यशसूरीश्वरजी यांच्याविरुद्ध समन्स बजावले होते. यशसूरीश्वरजी यांना कोर्टात हजर राहाण्याचेही आदेश दिले होते. परंतु, यशसूरीश्वरजी कोर्टात हजर राहिले नाही. त्यावर यशसूरीश्वरजी यांनी मंगळवारी न्यायाधीश एएस व्यास यांच्या कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. आपण कोणत्याही आधुनिक साधनसामुग्रीचा वापर करत नाहीत. त्यामुळे कोलकाता ते अहमदाबाद पायी येणार आहे. यासाठी किमान आठ महिन्यांचा कालावधी लागेल, असे कीर्ती यशसूरीश्वरजी यांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

‘न्यायाधीश महोदय, मी संन्यासी आहे. परंपरा आणि धार्मिकतेचे सदैव आचरण करतो. संसारातील प्रत्येक गोष्‍टीचा मी त्याग केला आहे. त्यामुळे त्यांचा वापर मी करू शकत नाही. बस, रेल्वे व विमान सेवा घेऊ शकत नाही. मी फक्त पायी येऊ शकतो. कोलकाता येथून अहमदाबाद येथे येण्यासाठी मला 8 महिन्यांचा कालावधी लागेल. माझा वॉरंट रद्द करून मला कोर्टात हजर राहाण्यात आठ महिन्यांची मुदत द्यावी. माझ्यामुळे कोर्टाच्या कामात कोणताही व्यत्यय येणार नाही.

दरम्यान, कोलकाता ते अहमदाबाद या दोन्ही शहरांमध्ये 2200 किलोमीटरचे अंतर आहे. पायी येण्यास किमात आठ ते 10 महिने लागण्‍याची शक्यता आहे. त्यात कीर्ती यशसूरीश्वरजीचे यांचे वय देखील जास्त आहे. त्यांमा मणक्यांचा त्रास आहे. यामुळे ते दररोज 10-12 किलोमीटर पेक्षा जास्त पायी चालू शकत नाहीत.

कोर्टाने प्रतिज्ञापत्र फेटाळले...
जैन संत कीर्ती यशसूरीश्वरजी यांचे प्रतिज्ञापत्र कोर्टाने फेटाळले आहे. न्यायाधीश एएस व्यास यांनी कीर्ती यशसूरीश्वर यांनी कोर्टात पुढील तारखेला हजार राहाण्याचे आदेश दिले आहे

काय आहे प्रकरण ?
जैन संत कीर्ती यशसूरीश्वरजी यांनी 2009 मध्ये 'बाल दीक्षा'शी संबंधित एक वृत्त एका धार्मिक मासिकात प्रसिद्ध झाले होते. केंद्र सरकारतर्फे प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीचा हवाला देखील कीर्ती यशसूरीश्वर यांनी यावेळी घेतला होता. या जाहिरातीमध्ये बाल दीक्षा कायद्याविषयी माहिती देण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ता जस्मिन शाह यांनी या संदर्भात माहितीच्या अधिकार कायद्यातर्गत माहिती मागवली होती. केंद्र सरकारने कधीही 'बाल दीक्षा'ला प्रोत्साहन दिले नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच केंद्र सरकारने या संदर्भात कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नसल्याचे देखील समोर आले. यानंतर जस्मिन शाह यांनी कीर्ती यशसूरीश्वरजी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. जैन समाजातील लोकांनी देखील कीर्ती यशसूरीश्वरजी यांना कडाडून विरोध केला होता.